Homeताज्या बातम्याविदेश

मनू भाकरने पटकावले कांस्यपदक

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पटकावले पहिले पदक

पॅरीस ः पॅरीस ऑलिम्पिकमध्ये भारताने रविवारी प्रथम पदक पटकावले असून, मनू भाकरने नवा विक्रम प्रस्थापत केला आहे. भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10

निसर्गानुभव कार्यक्रमात निसर्गप्रेमींना 374 वन्यप्राण्यांचे दर्शन
पृथ्वी शॉने पुन्हा आपल्या बॅटने दिले सडेतोड उत्तर
जखमी सूर्यकुमारची हटके पोस्ट; चाहत्यांनी दिल्या भन्नाट प्रतिक्रिया

पॅरीस ः पॅरीस ऑलिम्पिकमध्ये भारताने रविवारी प्रथम पदक पटकावले असून, मनू भाकरने नवा विक्रम प्रस्थापत केला आहे. भारताच्या मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टलमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताला हे पहिले कांस्यपदक मिळाले आहे. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी मनू भाकर ही पहिली महिला नेमबाज आहे. मनूने तिने अंतिम फेरीत 221.7 गुणांसह कांस्यपदक जिंकले. 2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनूचे पिस्तूल खराब झाले होते. तिला 20 मिनिटे लक्ष्य करता आले नाही. पिस्तूल दुरुस्त केल्यानंतरही मनूला केवळ 14 शॉट्स मारता आले आणि ती अंतिम शर्यतीतून बाहेर पडली. मनू निराश झाली होती पण तिने कमबॅक केले आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकले. कोरियाच्या ओ ये जिनने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तिने 243.2 गुण मिळवून ऑलिम्पिक विक्रम केला. कोरियाच्या किम येजीने रौप्यपदक जिंकले. तिने 241.3 गुण मिळवले.
या स्पर्धेनंतर बोलतांना मनू म्हणाली की, कृष्णाने अर्जुनाला केवळ लक्ष्यावर ध्यान देण्यास सांगितले होते, तेच फायनलमध्ये माझ्या डोक्यात सुरू होते, असे मनू भाकरने कांस्य पदक जिंकल्यानंतर सांगितले. 22 वर्षांची मून भाकर ही मूळची हरियाणातल्या झज्जर तालुक्यातली आहे. मनू भाकरने आपल्या नेमबाजी करिअरमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिने आपला ठसा उमटवलेला आहे. जागतिक नेमबाजीत मनू भाकरने आतापर्यंत दोन सांघिक पदके मिळवलेली आहेत. तर नेमबाजी विश्‍वचषकात मनू भाकरला नऊ सुवर्ण आणि दोन रौप्य पदकं मिळालेली आहेत. मनू भाकरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही वैयक्तिक सुवर्णपदक पटकावलेले आहे. 2022 साली मनू भाकरला एशियाडचे एक सांघिक सुवर्णपदक मिळाले होते.

नेमबाजीत 12 वर्षांनंतर मिळाले पदक – मनू भाकरने तब्बल 12 वर्षांनंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदक मिळवून दिले आहे. भारताला या खेळात 2012 मध्ये शेवटचे ऑलिम्पिक पदक मिळाले होते. नेमबाजीत भारताचे हे आतापर्यंतचे 5 वे पदक आहे. राज्यवर्धन सिंग राठोड यांनी 2004 मध्ये रौप्य, 2008 मध्ये अभिनव बिंद्रांनी सुवर्ण आणि विजय कुमार यांनी 2012 मध्ये रौप्य आणि गगन नारंग यांनी कांस्यपदक जिंकले होते.

COMMENTS