Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्त्याची पोलखोल केल्याने सरपंच पतीकडून शिवीगाळ

राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथिल रस्त्यांवर केंद्र सरकारचा कोट्यावधी रुपये खर्च करुन रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले

तुमचे आजचे राशीचक्र बुधवार, ०९ जून २०२१ l पहा LokNews24
कोंथिंबिर उत्पन्नातुन शेतकरी झाला लखपती (Video)
संचारबंदी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख उतरले रस्त्यावर

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथिल रस्त्यांवर केंद्र सरकारचा कोट्यावधी रुपये खर्च करुन रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले. निकृष्ट दर्जाचे काम केल्याने अवघ्या दोन ते तीन महिन्यात रस्त्यावर मोठ मोठी खड्डे पडले आहेत. याच खड्ड्यांचे फोटो गणेश दिलीप तोडमल या तरुणाने सोशल मीडियावर टाकल्याने टाकळीमियाचे सरपंच पती तथा ठेकेदार व सरपंच पत्नीने भ्रमणभाषवरुन संपर्क करुन शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. गणेश तोडमल या तरुणाने टाकळीमियाचे सरपंच लिलाबाई चंद्रकांत गायकवाड व सरपंच पती व ठेकेदार चंद्रकांत मोहन गायकवाड यांच्या विरोधात राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

               याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील टाकळीमिया व देवळाली प्रवरा ते मुसळवाडी या रस्त्यासाठी माजी.खा.सदाशिव लोखंडे यांनी केंद्राच्या निधीतून हे रस्ते मंजुर केले आहे.अवघ्या दोन तीन महिण्यापुर्वीच या रस्त्याचे काम करण्यात आले आहे.ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे  काम केल्याने मोठ मोठी खड्डे पडले आहेत. सोसायटी जवळील अंगणवाडील चिमुले विद्यार्थी याच खड्ड्यातील पाण्यातून वाट शोधीत अंगणवाडीत जातात. कोट्यावधी रुपये खर्च करुन हे रस्ते खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले होते.अवघ्या तीन महिण्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने गावातील ग्रामस्थ या नात्याने रस्त्यावरील खड्ड्यांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केले. सोशल मिडीयावरील फोटो वरुन टाकळीमियाचे सरपंच चंद्रकला गायकवाड व सरपंच पती तथा ठेकेदार चंद्रकांत मोहन गायकवाड यांना राग आल्याने गणेश तोडमल यांच्याशी भ्रमणभाषवरुन संपर्क साधुन शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत गणेश तोडमल याने राहुरी पोलिस ठाण्यात टाकळीमियाचे सरपंच चंद्रकला गायकवाड व त्यांचे पती चंद्रकांत गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. केंद्र सरकारचा निधी सर्वसामान्य जनतेच्या पैशातुन हा निधी उभारला गेला असल्याने या निधीतुन होणारी कामे चांगल्या दर्जाची होणे गरजेचे आहे. परंतु ठेकेदार व अधिकारी पैसे कमविण्यासाठी निकृष्ट दर्जाची कामे करतात. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अवघ्या दोन महिण्यात रस्त्यावर खड्डे पडले आहे. पडलेल्या खड्ड्याबाबत जाब विचारण्याचा ग्रामस्थ या नात्याने अधिकार आहे. ग्रामपंचायतीने तातडीने ग्रामसभा बोलवावी ग्रामसभेमार्फत या रस्त्यांची क्वालिटी कंट्रोलमार्फत तपासणी करावी अशी मागणी गणेश तोडमल यांनी पत्रकारांशी बोलताना केली. सरपंच व सरपंच पती यांनी ग्रामस्थाला आरेरावीची भाषा वापरीत जिवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल ग्रामस्थांवतीने जाहिर निषेध करण्यात आला.

COMMENTS