Homeताज्या बातम्यादेश

ऑलिंपिकपूर्वी फ्रान्सच्या रेल्वे नेटवर्कवर हल्ला

एल्वे स्टेशनवर तब्बल 8 लाख लोक अडकले

पॅरीस ः ऑलिंपिक स्पर्धा सुरू होण्यास अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असतांना फ्रान्सच्या रेल्वे नेटवर्कवर शुक्रवारी हल्लका करण्यात आला. त्यामुळे

ओबीसी आरक्षणाच्या जनगणना झाल्यावर निवडणूक घेण्यास हरकत नाही… राज ठाकरे
जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ डोस पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या
सांगलीच्या महिला उपजिल्हाधिकाऱ्यावर चाकू हल्ला

पॅरीस ः ऑलिंपिक स्पर्धा सुरू होण्यास अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असतांना फ्रान्सच्या रेल्वे नेटवर्कवर शुक्रवारी हल्लका करण्यात आला. त्यामुळे रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला असून, तब्बल 8 लाख लोक अडकले आहेत. पॅरीसच्या वेळेनुसार शुक्रवारी पहाटे 5:15 वाजता, अनेक रेल्वे मार्गांवर तोडफोड आणि जाळपोळ झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. हल्ल्यानंतर अर्ध्या तासात पॅरिसला जाणार्‍या आणि जाणार्‍या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. अनेक गाड्या 90 मिनिटे उशिराने धावत आहेत. या हल्ल्यामुळे जवळपास 8 लाख प्रवासी स्थानकांवर अडकून पडले आहेत. फ्रान्सची सरकारी रेल्वे कंपनीने सर्व प्रवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. त्यांना स्टेशनवर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
फ्रान्सच्या युरोस्टार रेल्वे कंपनीने सांगितले की,  त्यांनी अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. या हल्ल्यामुळे लंडन ते पॅरिसपर्यंत जाणार्‍या रेल्वे मार्गांना सर्वाधिक फटका बसला आहे. हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर कंपनीने आपल्या सर्व गाड्या वळवल्या आहेत. फ्रान्सचे वाहतूक मंत्री पॅट्रिस व्हर्जराइट यांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे हल्ल्याचा निषेध केला आहे. एसएनसीएफच्या सतत संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. फ्रान्सच्या नॅशनल रेल्वे कंपनीने सांगितले की, देशात एकूण 4 प्रमुख हाय-स्पीड ट्रेन लाइन आहेत, ज्या संपूर्ण देशाला पॅरिसशी जोडतात. त्यापैकी 3 हल्ले झाले, तर 1 रेल्वे मार्गावरील हल्ला हाणून पाडण्यात आला. ज्या लाईन्सवर हल्ला झाला त्यात अटलांटिक, नॉर्दर्न आणि ईस्टर्न लाईन्सचा समावेश होता. पॅरिसपासून 160 किमी अंतरावर असलेल्या फ्रान्सच्या अरास शहरात हा हल्ला झाला. यानंतर, कोर्टलेन शहरातील टूर्स आणि ले मॅन्स लाइनवर दुसरा हल्ला झाला.

COMMENTS