रांची ः छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात बालोदच्या डल्ली राजहराहून भानुप्रतापपूर, अंतागड, दुर्ग, रायपूरकडे जाणार्या पॅसेंजर ट्रेनला अपघात झाला. पॅस
रांची ः छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात बालोदच्या डल्ली राजहराहून भानुप्रतापपूर, अंतागड, दुर्ग, रायपूरकडे जाणार्या पॅसेंजर ट्रेनला अपघात झाला. पॅसेंजर ट्रेन रुळावर पडलेल्या वडाच्या झाडावर आदळली, ज्यात पायलटला किरकोळ दुखापत झाली. ही घटना भानुप्रतापपूरच्या मुळे कॅम्पजवळ घडली. पवन कुमार टंडन असे जखमी ट्रेनच्या लोको पायलटचे नाव आहे. पायलटला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. बहुतेक प्रवासी बोगी रिकाम्या होत्या, त्यामुळे मोजकेच प्रवासी ट्रेनमध्ये चढत असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
COMMENTS