Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागा वाटपासाठी काँगे्रसकडून 10 नेत्यांच्या नावांची घोषणा

मुंबई ः काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशान्वये महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी काँग्रेसने 10 सदस्यांची समिती गठीत केली

आंतरराष्ट्रीय योग दिवस जगातील सर्व राष्ट्रांपर्यंत पोहोचेल
शेतकर्‍यांनी केली पेरणीची सुरूवात
राहीबाई पोपेरे यांची बीज राखीच्या रूपाने अनोखी भेट

मुंबई ः काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशान्वये महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी काँग्रेसने 10 सदस्यांची समिती गठीत केली आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील जागावाटपासाठी 7 जणांची तर मुंबईसाठी तिघांना स्थान देण्यात आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महाविकास आघाडी आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांच्या जागावाटपाचे सुत्र ठरवण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रमुख नेते पुढाकार घेणार आहेत. तात्काळ प्रभावाने ही समिती आता कार्यरत झाली असून विधानसभा निवडणुका होईपर्यंत ही समिती कार्यरत राहणार आहे.
काँग्रेस वतीने जाहीर करण्यात आलेल्या दहा सदस्यांच्या समितीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या 7 नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील , नसीम खान, नितीन राऊत यांना स्थान देण्यात आले आहे. तर मुंबईच्या जागा वाटपासाठी वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख यांचा समावेश समितीत आहे. त्यामुळे, काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती आखण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या समितीमध्ये ज्येष्ठ नेत्यांपैकी सुशील कुमार शिंदे यांना स्थान देण्यात आलं नाही, तर युवा नेत्यांपैकी चर्चेत असलेल्या काँग्रेसच्या विश्‍वजीत कदम यांनाही स्थान मिळाले नाही. मात्र, कोल्हापूरच्या विजयात महत्वाचा वाटा असणार्‍या माजी मंत्री सतेज पाटील यांना 10 जणांच्या समितीत स्थान मिळाले आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातच महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांच्या निवासस्थानी प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये प्राथमिक चर्चा होऊन जागा वाटपाचा फॉर्मुला निश्‍चित झाला होता. त्यानंतर आता जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने समितीची घोषणा देखील केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत देखील उमेदवार जाहीर करून लवकर प्रचाराला लागण्याची महाविकास आघाडीने रणनीती आखली असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS