Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रक्षाबंधनाकरिता डाकविभागाद्वारे विशेष राखी कव्हर

रक्षाबंधनाचा सण त्याला टपाल खात्याचे कोंदण

अहमदनगर ः रक्षाबंधनासाठी डाक विभाद्वारे विशेष राखी कव्हर तयार करण्यात आले आहे. एका पाकिटाची किंमत 12 रुपये असून, या पाकीटासाठी दर्जेदार कागद वापर

वसुंधरेचे संरक्षण नागरिकांचे कर्तव्य : डॉ. सिद्दिकी
राज्य सरकारच्या विरोधात सुजय विखे, राम शिंदे, शिवाजी कर्डीले बसले उपोषणाला (Video)
राष्ट्रीय स्पर्धेत संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीचे यश

अहमदनगर ः रक्षाबंधनासाठी डाक विभाद्वारे विशेष राखी कव्हर तयार करण्यात आले आहे. एका पाकिटाची किंमत 12 रुपये असून, या पाकीटासाठी दर्जेदार कागद वापरला आहे. डिजिटल शुभेच्छांच्या युगात प्रत्यक्ष मिळालेली राखी आणि ती देखील विश्‍वासार्ह टपाल विभागाकडून म्हणून तिचे महत्व जास्त. पुणे क्षेत्राने विशेष योजना तयार केली आहे.
याविषयी अधिक माहिती देतांना पुणे क्षेत्राच्या वतीने बोलतांना पोस्ट मास्तर जनरल रामचंद्र जायभाये म्हणाले की, दर वर्षी या राखी पाकिटांना प्रचंड मागणी असते. सन 2020-21 मध्ये सुमारे 35 हजार, सन 2021-22 मध्ये 50 हजार, सन 2022-23 मध्ये आणि सन 2023-24 मध्ये 70 हजार अशी राखी पाकिटांची विक्रमी विक्री पुणे क्षेत्राच्या टपाल विभागाने केली आहे.  ग्राहक त्यांच्या राखी ’स्पीड पोस्टा’ ने देखील पाठवू शकतात त्यामुळे देशात तसेच परदेशातही राखी अतिशय जलद आणि वेळेवर पोहोचू शकेल. पाकीटावर लिहिलेल्या ‘राखी’ या शब्दामुळे राखी पाकिटांचे सॉर्टिंग करणे सोपे जाते शिवाय वेळेत राख्या पोहोचविण्यासाठी मुख्य टपाल कार्यालयात पिन कोड नमूद केलेल्या पेट्या ठेवण्यात आल्या आहेत आणि राखी पाकीट वेळेत पोहोचविण्यासाठी सर्व पोस्ट ऑफिस मध्ये सूचना देखील देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी प्रत्येक पाकिटावर प्राप्तकर्त्याचा आणि प्रेषकाचा व्यवस्थित पत्ता, पिन कोड आणि मोबाईल क्रमांक लिहावा तसेच टपाल कार्यालयातील पिन कोड असलेल्या पेटी मध्ये हे राखी पाकीट द्यावे, असे आवाहन करताना पोस्ट मास्तर जनरल श्री रामचंद्र जायभाये यांनी अजून अशी विशेष माहिती सांगितली की भावाने बहिणीला किंवा बहिणीने भावाला भेट देण्यासाठी म्हणून ‘माय स्टँप’ ची सुविधा शहरातील मुख्य पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध आहे, या अनोख्या भेटीमुळे रक्षाबंधन द्विगुणीत हर्षाने साजरे होईल! पुणे क्षेत्रातील पुणे, अहमदनगर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी टपाल खात्याच्या या अतुलनीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करताना पोस्ट मास्तर जनरल रामचंद्र जायभाये यांनी नागरिकांना केले आहे तसेच राखीपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीने पाठवलेली राखी आपल्या भाऊरायास वेळेत पोहच करण्याकरिता केडगाव पोस्ट ऑफिसमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी सर्वानी या सुविधेचा लाभ घ्यावा.
संतोष यादव, पोस्टमास्तर केडगाव

COMMENTS