Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वर्षा सुरासे-साळुंकेंना उत्कृष्ट योग शिक्षिका पुरस्कार

बेलापूर ः आपले गृहिणी पद सांभाळून विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान म्हणून अभिनव खानदेश प्रेरणादायी व जी

बाबूजींचे पुण्यस्मरण हे त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता होय : जगन्नाथ महाराज शास्त्री
चापडगावमध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची बैठक उत्साहात
वीजचोरी प्रकरणी दोन वर्षाचा तुरुंगवास; अहमदनगर न्यायालयाचा निकाल

बेलापूर ः आपले गृहिणी पद सांभाळून विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान म्हणून अभिनव खानदेश प्रेरणादायी व जीवनगौरव राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतात. हा पुरस्कार वर्षा सुरासे  यांना जाहीर झाला आहे.
धुळे येथील नलिनी प्रभाकर सूर्यवंशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे पुरस्कार प्रदान करण्यात येत असतात.पुणे येथील पिंपरी चिंचवड येथे ध्यान, प्राणायाम, योग क्षेत्रात आर्ट ऑफ लिविंग या संस्थेच्या शिक्षिका वर्षा सुरासे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.आपले गृहिणीपद सांभाळून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या नारी शक्तीचा गौरव म्हणून हे पुरस्कार दिले जातात. सांसारीक जबाबदार्‍या सांभाळताना आपल्या वैयक्तिक अडीअडचणी व छंद बाजूला सारून यशस्वी समाजिक कार्य व  विविध क्षेत्रात नाव मिळविणार्‍या महिलांचा सन्मान हा पुरस्कार देऊन करण्यात येतो. वर्षा सुरासे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पंढरीनाथ साळुंके, ज्योती साळुंके, प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, प्रताप साळुंके,अनिल साळुंके, राणी मगर, मालती ढवळे, नलिनी गावडे, पुष्पा भोर आदिंनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS