मुंबई ः 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक आणि पर्यावरणवादी चळवळीतील नेते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे गुरूव
मुंबई ः 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक आणि पर्यावरणवादी चळवळीतील नेते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे गुरूवारी निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वसईतील राहत्या घरी पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.फादर दिब्रिटो यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म 4 डिसेंबर 1942 रोजी वसई तालुक्यातील नंदाखाल गावी झाला होता. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बीए, तर धर्मशास्त्रात एमए पदव्युत्तर शिक्षण घेतले होते. 1972 मध्ये त्यांनी कॅथलिक धर्मगुरु पदाची दीक्षा घेतली. पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठवणारे कार्यकर्ते, सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची बहुआयामी ओळख होती. विशेष म्हणजे ’संघर्षयात्रा ख्रिस्तभूमी’ची हे पुस्तक लिहिण्यासाठी फादर दिब्रिटो यांनी इस्रायलमध्ये राहून काही काळ संशोधनही केले होते. ’सुबोध बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठी त्यांना 2013 सालच्या साहित्य अकादमी राष्ट्रीय अनुवाद पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांचे मराठीतील आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा, ओअॅसिसच्या शोधात, ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र), नाही मी एकला (आत्मकथन), संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास, सुबोध बायबल – नवा करार असे त्यांचे साहित्यही प्रकाशित झाले आहे.
COMMENTS