Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चांदोली परिसरात अतिवृष्ठी सुरु; वारणा धरणातून विर्सग वाढविला

शिराळा / प्रतिनिधी : चांदोली, ता. शिराळा परिसरात अतिवृष्ठी सुरू असून सकाळी आठ वाजले पासून आवघ्या 8 तासात 58 मी. मी. पाऊस चांदोली येथील प्रज

कोयनेत गढूळ पाणी पुरवठा; प्रकल्पावर महिलांचा हंडा मोर्चा
कामेरी येथील कब्बडी स्पर्धेचे निकाल जाहीर; सडोली, कासेगाव, इस्लामपूर, तासगाव, कौलव संघ पहिल्या फेरीत यशस्वी
बोंडारवाडी धरणासाठी आवश्यक निधी देणार : ना. अजित पवार यांची माहिती

शिराळा / प्रतिनिधी : चांदोली, ता. शिराळा परिसरात अतिवृष्ठी सुरू असून सकाळी आठ वाजले पासून आवघ्या 8 तासात 58 मी. मी. पाऊस चांदोली येथील प्रजन मापक केंद्रावर झाला आहे. वृक दरवाजातून 8812 क्युसेक्स तर वीज निर्मिती केंद्रातून 1648 क्युसेक्स असा एकूण 10460 क्युसेक्स जल विसर्ग वारणा नदी पत्रात सुरू आहे.
दरम्यान, अतिवृष्ठी व वादळी वार्‍यामुळे मणदूर धनरगवाडा येथील रामचंद्र विठ्ठल डोईफोडे यांच्या घरावर झाड कोसळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. करुंगली येथील राजाराम बाबुराव पाटील यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुसकान झाले आहे. करुंगली आरळा दरम्यान मुख्य रस्तावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली. सोनवडे येथील स्मशान भूमीत पाणी शिरले आहे. परिसरात गेल्या चार दिवसापासून वीज गायब असून जन जीवन पूर्ण पणे विस्कळीत झाले आहे. परिसरातील गावातील पाणी पुरवठाही विस्कळीत झाला आहे. शाहूवाडी व शिराळा तालुक्याला जोडणारा वारणा नदीवरील आरळा-शित्तूर हा महत्वाचा पूल चांदोली धरणातून जलविसर्ग वाढवल्याने पुलावर पाणी येऊन हा पुल वाहतुकीस बंद झाला. कोकरूड पोलिसांनी शिराळा तालुक्याच्या आरळा हद्दीत बॅरिकेट्स लावून पुलावरील वाहतूक बुधवारी सकाळी बंद केली. पुन्हा चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने पुलावर पाण्याची पातळी वाढली. तसेच वारणा नदी काठच्या शेतकर्‍यांचे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आल्याने आराळा बाजारपेठ ओस पडली आहे.

COMMENTS