Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अण्णा हजारेंनी विद्यार्थ्यांचा केलेला सन्मान ऊर्जादायी ः विद्या पवळे

सुपा ः पारनेर येथे संपन्न झालेल्या 24 व्या नॅशनल लेवल अबॅकस कॉम्पिटिशनमध्ये नारायण गव्हाण अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कॉम्पिट

उष्माघातामुळे 11 वर्षीय मुलाचा मृत्यू
पुणतांबा रेल्वे स्थानकावर तीन तास रेल रोको आंदोलन
सुनील उकर्डे यांना सांदिपणी गुरुकुलचा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार

सुपा ः पारनेर येथे संपन्न झालेल्या 24 व्या नॅशनल लेवल अबॅकस कॉम्पिटिशनमध्ये नारायण गव्हाण अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कॉम्पिटिशनमध्ये अगदी पाच मिनिटांमध्ये गणिताची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशी उदाहरणे सोडवली. या कॉम्पिटिशनमध्ये 2000 विद्यार्थी सहभागी होते. या अटी-तटीच्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी अगदी जीव ओतून उदाहरणे सोडवून उत्तम असे यश संपादन केले.
यामध्ये विद्या शेळके, अनुष्का शेळके, सरोदे कृष्णा, खोले वैष्णवी, राजवर्धन शेळके, पवळे राणा, भोसले श्रवण, फटांगडे आरोही, चव्हाण स्वरांजली, शेळके श्रेया, सुपेकर यश, फटांगडे हर्षल, देवश्री शेळके, शेळके पार्थ, शेळके रिद्धी या विद्यार्थ्यांनी उत्तुंग असे यश मिळवलेले आहे. यामध्ये मोलाचे मार्गदर्शन रेशमा कळमकर, कल्पना घडेकर यांसह सहकार्‍याचे लाभले. गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते या नॅशनल कॉम्पिटिशनचे बक्षीस वितरण केले गेले. या प्रसंगी अण्णा हजारेंकडून केलेल्या मार्गदर्शनातून मुलांना नवीन प्रेरणा मिळाली. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातही प्रगती करावी असे मार्गदर्शन अण्णांनी केले.विद्यार्थी हेच राष्ट्राची खरी संपत्ती असून, त्यांची शैक्षणिक होणारी उन्नती हीच राष्ट्राची खर्‍या अर्थाने प्रगती आहे, असे आशीर्वाद रुपी कौतुकाची थाप टाकत अण्णांनी विद्यार्थ्यांचा सन्मान केला.

COMMENTS