Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डिग्रस येथील चौकास त्यागमूर्ती रमाई आंबेडकर नाव द्यावे

ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन

आहुरी ः राहुरी-बारागाव नांदूर रस्त्यावरील डिग्रस फाटा येथील चौकास त्यागमूर्ती रमाई आंबेडकर चौक असे नाव देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुसंगम

एकही मृत्यू होऊ देणार नाही : धनंजय मुंडे | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24 |
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिर्डी येथे भव्य छायाचित्र प्रदर्शनास सुरूवात
शिवचरित्र व्याख्याता ओंकार व्यवहारे याने सादर केला ‘शिवतीर्थ’चा देखावा

आहुरी ः राहुरी-बारागाव नांदूर रस्त्यावरील डिग्रस फाटा येथील चौकास त्यागमूर्ती रमाई आंबेडकर चौक असे नाव देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनुसंगम शिंदे व वंचित बहुजन आघाडीचे धडाडीचे राहुरी तालुका उपाध्यक्ष गणेशराव पवार यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली आहे.
          राहुरी नगर परिषदेच्या हद्दीत येणार्‍या चौकांना व प्रवेशद्वारांना महापुरुष, महामातांची नावे दिली आहेत. त्याच धर्तीवर राहुरी-बारागाव नांदूर रस्त्यावर डिग्रस फाटा येथील चौकास त्यागमूर्ती रमाई आंबेडकर चौक नाव देऊन त्या ठिकाणी कमानीची उभारणी करण्याची मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाला करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन तहसीलदार, राहुरी, मुख्याधिकारी, राहुरी नगरपरिषद, राहुरी, पोलीस निरीक्षक, राहुरी यांना दिले असून निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, सामाजिक न्याय मंत्री, जिल्हाधिकारी, अहदनगर, जिल्हा पोलीस अधीक्षक, अहदनगर यांना पाठविल्या आहेत. निवेदनावरवर निसार पिंजारी, पत्रकार नाना जोशी, प्रवीण पुरोहित, हरिदास जाधव,रहमान शेख, दीपक काजळे, कादर शेख,सौ.छाया अनुसंगम शिंदे तसेच डिग्रस व बारावनांदुर येथील ग्रामस्थांच्या सह्या आहेत.

COMMENTS