Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दूध उत्पादक संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची भेट

अकोले ः राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्यासमवेत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानेने सोमवा

अपहरण झालेल्या चिमुकल्याची पोलिसांकडून सुटका
चारित्र्याच्या संशयावरून केला पत्नीचा निर्घूण खून
राहुरी शहरात वाढले डासांचे साम्राज्य

अकोले ः राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांच्यासमवेत दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळानेने सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या मागण्यांचे निवेदन दिले.शेतकर्‍यांकडून होणार्‍या दूध खरेदीचे दर सातत्याने कमी होत असल्याने गेली वर्षभर राज्यभरातील शेतकरी त्रस्त आहेत. गेली वर्षभर आंदोलने करून या प्रश्‍नाच्या सोडवणुकीसाठी रस्त्यावर उतरत असल्याचे यावेळी शिष्टमंडळाने सांगितले.  
शासनाने आंदोलनांची दखल घेत 5 जानेवारी 2024 रोजी प्रतिलिटर 5 रुपये अनुदान जाहीर केले. मात्र हे अनुदान केवळ दोन महिने देण्यात आले. अनेक अटी शर्ती लावल्यामुळे हजारो शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले. परिणामी निवडणुकांनंतर 28 जून 2024 पासून दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली शेतकरी आपल्या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलनात उतरले. सरकारने या पार्श्‍वभूमीवर दुध संघांनी व कंपन्यांनी शेतकर्‍यांना 3.5-8.5 गुणवत्तेच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर द्यावा, सरकार या दुधाला 5 रुपये अनुदान देईल असा तोडगा काढला. मात्र राज्यात खाजगी दुध संघांना असा दर देण्यासाठी बाध्य करणारा कायदा नसल्याने कंपन्या 3 रुपये दर देण्यास तयार नाहीत. वेगवेगळ्या क्लुप्त्या करून ते भाव देणे टाळत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले.

सरकारने आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर 5 जानेवारी 2024 रोजी अनुदानाची घोषणा केली. मात्र अनुदान केवळ 2 महिनेच मिळाले. पुढील काळात 11 जुलै 2024 पर्यंतच्या काळात दर कोसळलेले असताना व शेतकरी प्रतिलिटर 10 रुपयांचा तोटा रोज सहन करत असताना कोणतेही अनुदान शेतकर्‍यांना मिळालेले नाही. निवडणुकांनंतर अनुदान बंद होईल अशी रास्त भीती शेतकर्‍यांना यामुळे वाटते आहे. शिवाय ऑक्टोबरमध्ये दूध क्षेत्रात ‘फ्लश’ सीजन सुरु होईल. या सिजनमध्ये ऑक्टोबर ते मार्च या काळात दुधाचा पुरवठा वाढतो. परिणामी दुधाचे दर पडतात. आत्ताच ठोस उपाय योजना न केल्यास यामुळे दुधाचे भाव आणखी पडतील अशी शेतकर्‍यांना भीती असल्याचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगण्यात आले. कोतुळ दूध आंदोलन व ट्रॅक्टर रॅलीचे मा. शरद पवार साहेब यांच्या उपस्थित मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन सादर केले. डॉ. अजित नवले, विनोद देशमुख, अभिजित देशमुख, बबलू देशमुख, प्रकाश देशमुख व नामदेव साबळे यांचा शिष्टमंडळात समावेश होता. उद्या 23 जुलै रोजी कोतुळ ते संगमनेर भव्य ट्रॅक्टर रॅली निघणार असून अकोले व संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादक पक्ष भेद विसरून शेतकरी म्हणून आंदोलनात सामील होत आहेत. शरद पवार यांनी अकोले येथील मेळाव्यात शब्द दिल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांकडे दूध उत्पादकांचा प्रश्‍न मांडण्यासाठी पुढाकार घेतला.  

COMMENTS