Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांना करियर निवडताना स्वातंत्र्य द्या, मंत्री भुसे यांचे पालकांना आवाहन

नाशिक: शिवसेना प्रणीत भारतीय विद्यार्थी सेना आयोजीत १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच करियर मार्गदर्शन शिबिर रावसाहेब थोरात सभागृह

Solapur : लक्झरी बस, ट्रॅक्टर धडकेत 2 ठार 7 जखमी | LOKNews24
संभाव्य वादळीवारा व पाऊस शक्यतेबाबत नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी : तहसीलदार चंद्रे
सांगवड पुलाजवळ भीषण अपघात; 3 ठार, 2 गंभीर

नाशिक: शिवसेना प्रणीत भारतीय विद्यार्थी सेना आयोजीत १० वी व १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच करियर मार्गदर्शन शिबिर रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते. तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळावी, तुम्हाला उत्तुंग भरारी घेण्याचे बळ मिळावे यासाठी आजचा हा मेळावा प्रेरणादायी असल्याचे मत मंत्री भुसे यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भुसे म्हणाले सर्वच क्षेत्रात स्पर्धा आहे, आपले ध्येय निश्चित करून भविष्यातील संधी ओळखून आपले करियर निवडा. पालकांनी देखील विद्यार्थ्यांवर आपले स्वप्न लादू नयेत त्यांना करियर निवडताना स्वातंत्र्य द्या असे आवाहन देखील मंत्री भुसे यांनी केले. विद्यार्थ्यांशी बोलताना भुसे म्हणाले की तुम्ही ‘गुणवंत’ आहात म्हणुन यश प्राप्त करण्याची जबाबदारी वाढली आहे. आनंदाने कठोर मेहनत घेवून आपला यशाचा आलेख ऊंचावत ठेवा. आपल्या सरकारने विद्यार्थिनींची जबाबदारी घेतली असून शिक्षण मोफत केले आहे. यामुळे युवतींना आता हव ते शिक्षण घेता येणार असल्याचे मंत्री भुसे म्हणाले.

यावेळी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच 10 वी 12 वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, सुवर्णा मटाले, अस्मिता देशमाने, योगिता ठाकरे, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, पो. उपायुक्त प्रशांत बच्छाव, शशिकांत कोठुळे, अंबादास जाधव, किरण फडोल, युवराज मोरे, रोशन शिंदे, आदित्य बोरस्ते आदी शिवसेना पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सारथी, बारटी, महाज्योती, तसेच इतर संस्थांच्या माध्यमातून निवास व्यवस्था तसेच काही कोर्सेस देखील मोफत देण्यात येत आहेत. मुलींना जवळपास ६०० कोर्सेसची १०० टक्के फी माफ करण्याचा निर्णय गेल्या अधिवेशनात सरकारने घेतला. या निर्णयाचा अंदाजे २ लाख ५ हजार ४९९ मुलींना लाभ मिळणार असून, सुमारे २ हजार कोटी रुपयांचा भार सरकारी तिजोरीवर पडेल. बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलींना आपलं उच्च शिक्षण पूर्ण करता यावं यासाठी सरकारने ही योजना आणली, युवकांसाठी देखील शिष्यवृत्तीच्या माध्यमातून लाभ घेता येणार असल्याची माहिती भुसे यांनी दिली.

भुसे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन योजना आणली आहे, यातून विद्यार्थ्यांना देखील चांगली मदत होणार आहे. करियर निवडताना काळजी घ्यावी लागते. चुकीचे करियर निवडले तर आयुष्याचा मार्ग भटकतो. यामुळे आयुष्यात करियर मार्गदर्शन गरजेचे आहे. आपल्या आकांक्षा आणि स्वप्नांना जोडण्यात करियर प्लॅनिंग महत्वाचा आहे. करियर निवडताना सकारात्मक दृष्टिकोण महत्वाचा आहे. पद, प्रतिष्ठा, पैसा यापेक्षा आनंद देणारे करियर आपण निवडले पाहिजे.

पालक आणि शिक्षकांनी आपल्या अपेक्षा लादण्यापेक्षा विद्यार्थ्यांना त्यांचे करियर निवडण्याची संधि द्यावी. आयुष्याची वाटचाल करत असताना थोर समाज सुधारकांचे चरित्र डोळ्यासमोर ठेवा आयुष्यात नक्कीच यशाला गवसणी घालाल असा विश्वास मंत्री भुसे यांनी व्यक्त केला.

COMMENTS