Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरकार विरोधी पक्षाला विश्‍वासात घेत नाही : आ. जयंत पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : सरकारने विरोधी पक्षाला विश्‍वासात घेत आरक्षणासारख्या महत्वाच्या प्रश्‍नावर निश्‍चित तोडगा काढायला हवा होता. मात्र, सरका

महिलेला ’आयटम’ म्हणणे विनयभंग : युवकाला दीड वर्षांची शिक्षा
दहिवडीत चेक बाउन्स प्रकरणी राजू शिंदे यास सहा महिन्याचा कारावास; प्रियदर्शनी पतसंस्थेला दोन लाखाची नुकसान भरपाई
Yeola : येवला तालुक्यातील धुळगाव येथील भूमिपुत्राला अखेरचा सलाम (Video)


इस्लामपूर / प्रतिनिधी : सरकारने विरोधी पक्षाला विश्‍वासात घेत आरक्षणासारख्या महत्वाच्या प्रश्‍नावर निश्‍चित तोडगा काढायला हवा होता. मात्र, सरकार विरोधी पक्षाला विश्‍वासात घेत नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. आपण गेल्या 5 वर्षात 1 हजार 15 दिव्यांग व्यक्तींना 1 कोटी 20 लाखाचे अवयव व साहित्याचे वाटप केल्याचेही त्यांनी सांगितले.
येथील राजारामबापू ज्ञान प्रबोधिनी संचालित जयंत दारिद्य्र निर्मूलन अभियानने सिटीअस टेक हेल्थ केअर यांचे वतीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून 250 दिव्यांग बांधवांना मोफत व्हील चेअर वाटप करून जयंत महा-ई-सेवा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. शमिका नाडकर्णी, प्रा. शामराव पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील, आष्ट्याचे वैभव शिंदे, माजी नगराध्यक्ष पै. भगवान पाटील, मुनीर पटवेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, माजी तालुकाध्यक्ष बी. के. पाटील, अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे प्रामुख्याने उपस्थित होते.
आ. पाटील म्हणाले, आरक्षणासारखा महत्वाचा प्रश्‍न सोडविण्याची जबाबदारी सरकारची आहे. कोणत्याही महत्वाच्या प्रश्‍नावर विरोधी पक्षाला विश्‍वासात घेण्याचा संकेत सरकार पायदळी तुडवत आहे. सरकारने विरोधी पक्षाला केवळ बैठक आणि चर्चेला बोलविताना ते काय करणार आहेत, हे सांगायला हवे. सध्या सेतू केंद्रातून सामान्य माणसांची लूट चालली असून लोकांना हेलपाटे घालायला लागणे, दुर्दैवी आहे. आम्ही इस्लामपूर येथे सुरू केलेल्या सेतू केंद्रातून शासकीय दरात विनासायास सेवा मिळेल. डॉ. शमिका नाडकर्णी यांच्या माध्यमातून सिटीअस टेक हेल्थ केअर यांनी दिव्यांग बांधवांना 15 लाख रुपयांच्या 250 व्हील चेअर,तसेच 19 लाख रुपयांची अद्यावत ऍम्ब्युलन्स दिली आहे. अभियानने गेल्या 18 वर्षात 7 हजार 349 कुटुंबांना 47 कोटी 91 लाखाची आरोग्य, शिक्षण, स्वयंरोजगार आदी क्षेत्रात मदत केली आहे. आम्ही गोर-गरीब व सामान्य माणसांच्यासाठी अद्यावत आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यावेळी डॉ. शमिका नाडकर्णी, अ‍ॅड. चिमण डांगे यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांनी स्वागत, प्रा. शामराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. संदीप तांबवेकर यांनी सूत्रसंचालन केले. अभियानचे समन्वयक इलियास पिरजादे यांनी आभार मानले. याप्रसंगी आबासाहेब राक्षे खेड, जिल्हा युवक निरीक्षक अरुण हासबे, वक्ता सेल जिल्हाध्यक्ष प्रा. संतोष जाधव, तुषार वाघमारे, बाळासाहेब पाटील, देवराज पाटील, विनायक पाटील, शशिकांत पाटील, व्यंकटराव पाटील, संजय पाटील, सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने, खंडेराव जाधव, संग्राम जाधव, देवराज देशमुख, विश्‍वनाथ डांगे, पुष्पलता खरात, अरुण कांबळे, पै. गुलाब पाटील, आयुब बारगीर, दिव्यांग संघटनेचे रामचंद्र पाटील, प्रकाश पवार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक तसेच दिव्यांग व त्यांचे पालक उपस्थित होते.

COMMENTS