Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दारूच्या नशेत एकीने घेतला गळफास तर दुसरी बेशुद्ध

पुणे : पुण्यामध्ये अल्पवयीन मुले दारूच्या नशेत जात असल्याचे समोर येतांना दिसून येत आहे. हिट अ‍ॅण्ड रनच्या घटनेत अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन केल्य

नारायण उंडे ची गळफास घेऊन आत्महत्या
तोंडात सुतळी बॉम्ब ठेवत तरुणाची आत्महत्या
दोन सख्ख्या बहिणींसह चार मैत्रिणींनी घेतले विष; दोघींचा मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये अल्पवयीन मुले दारूच्या नशेत जात असल्याचे समोर येतांना दिसून येत आहे. हिट अ‍ॅण्ड रनच्या घटनेत अल्पवयीन मुलाने मद्य प्राशन केल्याचे समोर आल्यानंतर पुण्यातील येरवडा येथे देखील दोन अल्पवयीन मुलींनी केलेल्या दारू पार्टीत एकीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे, तर दुसरी बेशुद्ध पडल्याचे समोर आले आहे.
येरवडा येथे एका फ्लॅटमध्ये दोन अल्पवयीन मैत्रिणींनी दारू पार्टी केली. यात अतिमद्यपान केल्याने एकीने गळफास घेऊन आत्महत्या केली तर दुसरी मुगली बेशुद्धावस्थेत आढळली. ही घटना सोमवारी रात्री घडली. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यातील एका मुलीने आत्महत्या का केली ? याचे कारण समजू शकले नाही. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मृत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेमुळे पुण्यातील तरुणाई व्यसनांच्या आहारी चालले असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या दोन्ही मुली मैत्रिणी आहेत. सोमवारी रात्री या अल्पवयीन मुली येरवडा वडार वस्ती येथील सेवक चौक जवळ, असलेल्या लक्ष्मी नगर येथील नागपूर चाळ येथील एका सोसायटीत दारू पिण्यासाठी एकत्र आल्या. त्यांनी दारू विकत आणली आणि घरात एकत्र दारू पिण्यासाठी बसल्या. दोघींनी अतीमद्य सेवन केले. दारूच्या नशेत एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसरी मुलगी ही अतीमद्यसेवनाने बेशुद्ध पडली. सकाळी दोघींच्या मित्राने त्यांना फोन केला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. यामुळे टॉ दोघींच्या घरी गेले तेव्हा ही बाब उघड झाली. याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी आले तेव्हा त्यांना एका मुलीने गळफास घेतल्याचे दिसले तर दुसरी उलट्या करून बेशुद्ध पडली असल्याचे आढळले. पोलिसांनी तातडीने बेशुद्ध झालेल्या मुलीला दवाखान्यात भरती केले. तर आत्महत्या केलेल्या मुलीचा मृतदेह हा ससुन येथे शवविच्छेदनासाठी नेला आहे, अशी माहिती येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेळके यांनी दिली. पुण्यात एल 3 पबमध्ये काही तरुण ड्रग्स घेतांना आढळले होते. यानंतर या बार आणि पबवर कारवाई करण्यात आली. त्या पूर्वी कल्याणी नगर येथे दारू पिऊन पोर्शे कार चालवून दोघांना उडवले होते. तर दोन तरुणी दारूच्या नशेत या वेताळ टेकडी येथे आढळल्या होत्या. या घटनांमुळे पुण्यातील तरुणाई ही नशेच्या आहारी गेली असल्याने त्यांच्या भविष्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

COMMENTS