Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॅम्लिन समूहाचे प्रमुख सुभाष दांडेकर यांचे निधन

मुंबई : कॅम्लिन उद्योगसमूहाचे आधारस्तंभ व हजारो कुटुंबाना रोजगार मिळवून देणारे मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर यांचे सोमवारी निधन झाले. दांडेकर या

अत्याचार करणार्‍यांना प्रतिकार करण्याचे सामर्थ्य अंगीकारा
श्रीपाद छिंदमकडून टपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण l LokNews24
आर्थिक गुन्हे शाखेकडे आता दहा कोटींच्या पुढची प्रकरणे

मुंबई : कॅम्लिन उद्योगसमूहाचे आधारस्तंभ व हजारो कुटुंबाना रोजगार मिळवून देणारे मराठमोळे उद्योजक सुभाष दांडेकर यांचे सोमवारी निधन झाले. दांडेकर यांच्या निधनाबद्दल उद्योग व सामाजिक वर्तुळातून तीव्र दु:ख व्यक्त होत आहे. शालेय विद्यार्थ्यांना लागणारी गणितीय उपकरणे, पेन्सिल, मार्कर, शाई यांसह चित्रकार व अन्य कलाकारांना लागणारे सर्व प्रकारचे साहित्य, कार्यालयीन उत्पादने आणि व्यावसायिक उत्पादनांची निर्मिती करणारी कॅम्लिन ही देशातील एक आघाडीची कंपनी आहे. सुभाष दांडेकर यांनी अनेक वर्षे कंपनीची धुरा वाहिली. त्यांच्या कंपनीने एक प्रकारे विद्यार्थ्यांपासून कलाप्रेमी ज्येष्ठांच्या आयुष्यात रंग भरले. त्यांच्या निधनाने रंगांचा जादूगार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

COMMENTS