संगमनेर ः ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियान अंतर्गत थोरा
संगमनेर ः ग्लोबल वार्मिंगच्या समस्येवर मात करण्यासाठी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या दंडकारण्य अभियान अंतर्गत थोरात कारखान्याच्या वतीने चंदनापुरी घाटात 5000 विविध झाडांचे गुरूवारी रोपण करण्यात आले. तर गावागावांसह तालुक्यातील तीन घाटात व अकरा डोंगरांवर विविध सहकारी संस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संगोपन करण्यात येत असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.
चंदनापुरी घाटात सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने 19 व्या दंडकारण्य अभियानांतर्गत विविध 5000 झाडांचे रोपण करण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, व्हा. चेअरमन संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, आर.बी. राहणे, अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, संचालक रमेश गुंजाळ, प्रा. बाबा खरात, शांताराम कढणे, विजय राहणे,उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, सामाजिक वनीकरण विभागाचे सचिन लोंढे, स्मिता आठरे, अशोक रहाणे, प्रकाश कोटकर, कैलास सरोदे, बबन सावंत, बाळासाहेब फापाळे, शरद गुंजाळ, शंकरराव ढमक, आदींसह कारखान्याचे विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात व मा. आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियानाचे हे एकोणिसावे वर्ष आहे. या अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावागावात मोकळ्या जागेत वृक्षारोपण सुरू आहे या वृक्षांच्या संगोपनाची जबाबदारी त्या स्थानिकांवर देण्यात आली आहे. तर तालुक्यातील शिखर संस्थांच्या वतीने तालुक्यातील विविध अकरा डोंगरांवरती वृक्षारोपण केले जात असून संवर्धन व संगोपन केले जात आहे. तसेच आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाट, कर्हे घाट, कोची घाट या घाटांमध्ये वृक्षारोपणासह दरवर्षी रस्त्यांच्या दुतर्फा रंगीबेरंगी फुलांचे रोपण करण्यात येते त्यामुळे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात हा परिसर अत्यंत सुंदर दिसतो. यावर्षीही या घाटांमधील रस्त्यांच्या दुतर्फा विविध रंगीबेरंगी फुलांचे रोपण करण्यात येणार आहे. कोरोना संकटामध्ये ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांनी अनुभवले असून आता उन्हाळ्यामध्ये वाढलेले तापमान कमी झालेल्या पाऊस या ग्लोबल वार्मिंग च्या समस्या कमी करण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनाच्या या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले
रिमझिम पावसात पर्यावरणाच्या गाण्यांनी परिसर दुमदुमला – सह्याद्री डोंगरांमध्ये असलेल्या चंदनापुरी घाटामध्ये हिरवाईचे पांघरून घेतलेले सुंदर डोंगर, रिमझिम पाऊस सुरू असताना प्रा. बाबा खरात यांनी पाऊस व पर्यावरणाची गीते गाऊन वातावरणामध्ये चैतन्य निर्माण केले. यावेळी दुर्गाताई तांबे व इतरांनी या गीतांना साथ देत गाणी म्हणत, हाती टिकाव खोरे घेऊन विविध ठिकाणी वृक्षारोपण केले.
COMMENTS