Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पारनेर तालुक्यातील वारकर्‍यांची आरोग्य तपासणी

निघोज ः  पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांनी पारनेर तालुक्यातील वारकरी दिंडी सोहळा पायी वारीतील भावकांची आरोग्याची काळजी घेत बुधवार

Parner : पारनेरला तहसीलदार देवरेंनी केला सहा कोटीचा भ्रष्टाचार? : लोकायुक्तांकडे तक्रार l LokNews24
कर्जतमध्ये संगीतमय कार्यक्रमासह सामाजिक उपक्रम उत्साहात
कोपरगावच्या साई सालकरची उत्तुंग भरारी

निघोज ः  पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांनी पारनेर तालुक्यातील वारकरी दिंडी सोहळा पायी वारीतील भावकांची आरोग्याची काळजी घेत बुधवारह सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत पन्नास पेक्षा जास्त दिंड्यांना भेट देऊन प्रत्येक वारकर्‍याची आरोग्य तपासणी करीत त्यांना मोफत औषधे देऊन सेवाभाव केला आहे.
या असोसिएशनचे हे दुसरे वर्ष असून यामध्ये प्रत्येक दिंडीतील वारकर्‍याची आरोग्य तपासणी करीत त्यांना औषधे देण्याचे काम या पारनेर तालुक्यातील वैद्यकीय पथकाने केले आहे. यामध्ये निमा संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. अशोकराव सरोदे, डॉ, अजित लंके डॉ, सुनिल कदम, डॉ. बाळासाहेब घोगरे, डॉ.पांडुरंग थोरात, डॉ. बेलोटे, डॉ . कांडेकर, डॉ. श्रीमंदीलकर, डॉ. आढाव, डॉ. झावरे बी बी आदिंनी तसेच त्यांच्या सहकार्‍यांनी हा सेवाभाव केला आहे. यामध्ये प्रामुख्याने भाऊसाहेब कोल्हे अध्यक्ष असलेली रामदास महाराज दुसाणे दिंडी सोहळा, थोरात महाराज यांची कुंड माऊली मळगंगा दिंडी सोहळा, गोरक्ष ढवण यांची कानिफनाथ दिंडी सोहळा, दत्तात्रय रसाळ यांची संत सावता दिंडी सोहळा तसेच अशोक सावंत यांची श्री संत निळोबाराय पालखी सोहळा आदी पन्नास पेक्षा जास्त दिंडी सोहळ्यातील पायी वारी भावीकांची वैद्यकीय पथकाने सुश्रुषा केली आहे. ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. अशोकराव सरोदे यावेळी म्हणाले या निमित्ताने वारीचा अनुभव कसा असतो याची माहिती तसेच प्रत्यक्ष वारकर्‍यांची सेवा म्हणजे प्रत्यक्षात पंढरपूरच्या पांडुरंगाची सेवा होत आहे या माध्यमातून गेल्या वर्षापासून ही वैद्यकीय सेवा मोफत तसेच असंख्य वारकर्‍यांना तब्बल तीस हजार रुपयांची औषधे मोफत दिली असून प्रत्येक दिवशी दहा ते बारा किलोमीटर पायी वारी करीत भावीक पंढरपूरला जातात पांडूरंगाची ओढ त्यांच्या मनात सातत्याने असते. आम्ही जे काही करीत आहोत ती एक सेवाभावी वृत्ती असून या निमित्ताने हिंदू समाजाच्या धार्मिक संस्कृतीला पाठबळ देण्याचे पुण्य आमच्या हातून होत असून आम्ही सुद्धा वारकर्‍यांएढेच भाग्यवान असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे. गेली पाच वर्षांपासून पायी वारी करणार्‍या कन्हैया ज्वेलर्सच्या संचालिका शोभाताई मुकुंदराव निघोजकर यावेळी म्हणाल्या वारीचा आनंद काही औरच आहे. प्रत्यक्षात पांडुरंग ही सेवा वारकर्‍यांकडून घेत असल्याचा अनुभव मला या वारीत क्षणोक्षणी आला आहे. पारनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वैद्यकीय पथकाने वारकर्‍यांची वैद्यकीय सेवा करीत एक चांगले काम केले असून गेली अनेक दिवसांपासून वारकर्‍यांची पायी वारी सुरू असून यामध्ये सरकारने सुद्धा मोठ्या प्रमाणात सोयीसवलती देत वारकर्‍यांची सेवा केली असून पारनेर तालुक्यातून खाजगी डॉक्टरांनी मोफत औषधे देत तसेच तपासणी करीत चांगला सेवाभाव केला असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे.

COMMENTS