कोपरगाव तालुका ः व्यावसायिकांची मुलाखत हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम नगरपालिका शाळा क्र.6 येथील शिक्षिका सुनिता इंगळे यांनी इयत्ता पाचवीच्या वर्गासाठ
कोपरगाव तालुका ः व्यावसायिकांची मुलाखत हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम नगरपालिका शाळा क्र.6 येथील शिक्षिका सुनिता इंगळे यांनी इयत्ता पाचवीच्या वर्गासाठी सुरु केला आहे.विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिकांची माहिती व्हावी,आपल्या कोपरगाव शहरात कोणते व्यवसाय चालतात ? देशाचा अभ्यास करताना सर्वप्रथम आपले गाव विद्यार्थ्यांना माहिती हवे हा दृष्टिकोन समोर ठेऊन त्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. त्याचे पहिले पुष्प म्हणून कोपरगाव शहरातील चंद्रकांत प्रिटिंग प्रेस ला विद्यार्थ्यांसह भेट देण्यात आली.
यावेळी प्रिंटिग प्रेसचे मालक चंद्रकांत नागरे, महेश नागरे यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष छपाई मशीन दाखवले. त्यावर काही कागद टाकून प्रत्यक्ष छपाई कशी केली जाते हे प्रात्यक्षिकासह दाखवले.यावेळी कागद कट करण्याचे मशीन, पीना मारण्याचे यंत्र मुलांनी बघितले.यावेळी विद्यार्थ्यांनी कुतुहलपूर्ण प्रश्न विचारले. त्यात तुमचे नाव काय,हे मशीन केवढ्याला घेतले? हे मशीन इथे विकत मिळते का? तुम्ही एकटेच काम करतात का? या मशीनमध्ये नोटा छापल्या जातात का? उरलेल्या कागदांचे तुम्ही काय करता?असे कुतूहलपूर्ण प्रश्न विचारले. यावेळी महेश नागरे यांनी अतिशय मुलांना समजेल अशा भाषेत समर्पक उत्तरे दिली.पुढील भविष्याच्या दृष्टीनेही मुलांना व्यावसायिकाची माहिती असणे खूप गरजेचे आहे असे महेश नागरे म्हणाले.व्यावसायिकांची मुलाखत यात अमन शेख, अजिम शेख, आसद शेख, अर्शद बागवान, आहिल परमार, अजिंक्य पाटोळे, फैय्याज बागवान, यश वाकचौरे, शुभम कांबळे, आरव तुपसुंदर, सोमनाथ गायकवाड, युवराज माळी यात सहभाग घेऊन महेश नागरे यांची मुलाखत घेतली.सुनिता इंगळे यांच्या व्यावसायिकांची मुलाखत या उपक्रमाचे शाळेच्या मुख्याध्यापिका सविता साळुंके, शिक्षक अरुण पगारे, आरती कोरडकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा अर्चना वाहुळकर यांनी कौतुक केले आहे.
COMMENTS