Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुखदेव सुकळे यांचे कार्य भूषणावह

ह.भ.प.प्रा. सखाराम कर्डिले महाराज यांचे प्रतिपादन

शिरसगाव ः संतांनी आणि समाजसेवकांनी आपल्या सत्कार्यातून समाज व राष्ट्र उभारणीचे कार्य केले, आजही अनेकांचे योगदान सुरु आहे, हस्तस्य भूषणम् दानम्, व

शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना | LOKNews24
हद्दपार असताना शहरात फिरणार्‍या एकास पकडले
जामखेडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे

शिरसगाव ः संतांनी आणि समाजसेवकांनी आपल्या सत्कार्यातून समाज व राष्ट्र उभारणीचे कार्य केले, आजही अनेकांचे योगदान सुरु आहे, हस्तस्य भूषणम् दानम्, वाणी कंठस्यभूषणम् असे कार्य विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुखदेव सुकळे करीत असल्याचे गौरवोद्गार ह.भ.प. प्रा. सखाराम कर्डिले महाराज यांनी काढले.
श्रीरामपूर येथील मेनरोडवरील आगाशे सभागृहात विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्वशील मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सखाराम कर्डिले महाराज बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष माजी प्राचार्य टी.ई. शेळके होते. प्रारंभी साक्षात्कारी संत काशिनाथ महाराज व स्व.सौ.पुष्पाताई सुकळे प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून पाहुण्यांचा सत्कार केला. यावेळी चंद्रपूर जिल्ह्यातील उसगावच्या सरपंच निविताताई धनंजय ठाकरे यांना स्व. सौ. पुष्पाताई सुखदेव सुकळे स्मृती नारी शक्ती स्त्री सन्मान पुरस्कार आणि सुरेश बाबुराव बुरकुले यांना अमृतमहोत्सवी सन्मान पुरस्कार प्राचार्य टी.ई. शेळके व प्रा. सखाराम कर्डिले महाराज यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, बुके ,पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ बाबुराव उपाध्ये व सौ. उज्ज्वलाताई बुरकुले यांनी मानपत्राचे वाचन केले. माजी प्राचार्य शंकरराव अनारसे व डॉ.उपाध्ये यांनी पुरस्कारार्थींचा पुस्तके देऊन सन्मान केला. यावेळी डॉ. प्रकाश मेहकरकर,ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम, माजी तहसिलदार गुलाबराव पादीर, माजी प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्रा. शिवाजीराव बारगळ , माजी प्राचार्य किसनराव वमने, माजी मुख्याध्यापक भागवतराव मुठे, सुदामराव औताडे पाटील, लहानू राहणे, जनार्दन काटकर, कुंडलिक पाफाळे, मुख्याध्यापक सुनील साळवे, लेविन भोसले, आरोग्यमित्र सुभाषराव गायकवाड, प्रा. रमेश चौधरी, दतात्रय चव्हाण, बाबासाहेब चेडे, लिंगायत समाज अध्यक्ष विशाल निकडे, अड, नाईक, आरोग्यमित्र भीमराज बागूल, योगेश झाडबुके, नाथा वारे, सुभाष वाघुंडे, सुरेश कल्याणकर, उसगाव येथील संदेश ठाकरे, यमुना राजूरकर, योगिता देऊळगावकर, सुनील देऊळगावकर, राजेंद्र बुरकुले, नीतीन बुरकुले, शीतल बुरकुले, अर्चना बुरकुले, तेजस्वी बुरकुले, वेदांत बुरकुले, भूमी बुरकुले आदी उपस्थित होते. बाळासाहेब बुरकुले, साहेबराव सुकळे, संजय बुरकुले, सुरेखा बुरकुले, उज्ज्वला बुरकुले, सुयोग बुरकुले, संकेत बुरकुले, शीतल बुरकुले आदिंनी नियोजन केले. प्राचार्य टी.ई. शेळके यांनी अध्यक्षीय भाषणातून उसगावच्या सरपंच सौ. निविताताई ठाकरे आणि सुरेश बुरकुले यांचा योग्य सन्मान झाल्याचे सांगून पुरस्कार हे माणसाला सत्कार्याचे बळ देतात असे विचार मांडून कोणतेही सत्कार्य हे समाजाची उभारणी करते असे उद्गार काढले. सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर सुदामराव औताडे पाटील यांनी आभार मानले

COMMENTS