Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोकण रेल्वेची सेवा विस्कळीत

पेडणे बोगद्यात चिखल साठल्याने 13 एक्सप्रेस गाड्या रद्द

मुंबई : कोकणात गेल्या काही दिवसांनपासून जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यात पुरसदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. या पावसाचा फटका हा क

जुन्या पेन्शनबाबत मध्यमार्ग काढू – मुख्यमंत्री शिंदे
जामखेड पोलिस स्टेशनच्या वतीने 3 जून रोजी रक्तदान शिबीर
दख्खनची राणी ९२ व्या वर्षात पदार्पण करणार

मुंबई : कोकणात गेल्या काही दिवसांनपासून जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यात पुरसदृश्य परिस्थिती तयार झाली आहे. या पावसाचा फटका हा कोकण रेल्वेला बसला आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे गोव्यातील पेडणे बोगद्यात माती व चिखल साठला असून त्यामुळे रात्री तीन वाजल्यापासून गोव्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवासी अडकून पडले आहेत. तर मुंबईहून या मार्गावर जाणार्‍या 13 एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. कोकणात तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे विस्कळीत झाली आहे. मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे गोव्यातील पडणे बोगद्यात माती आणि चिखल साचल्याने अनेक गाड्या या सावंतवाडीत खोळंबल्या आहेत. येथील माती आणि चिखल काढण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या पावसामुळे मुंबई ते मडगाव या कोकण रेल्वे मार्गावरील सर्वच गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तर काही गाड्यांचा मार्ग हा बदलण्यात आला आहे. पावसामुळे आज, चंदीगड एक्सप्रेस 12449 मडगाव जंक्शन, 12620 बंगळुरू सेंट्रलला जाणारी लोकमान्य टिळक एक्सप्रेस, 12134 मंगळुरू जंक्शन मुंबई सीएसएमटी एक्सप्रेस, 50107 सावंतवाडी रोड एक्सप्रेस, रद्द करण्यात आल्या आहेत. तर 16345 लोकमान्य टिळक तिरुअनंतपुरम एक्सप्रेस, 22113 लोकमान्य टिळक कोचिवल एक्सप्रेस, 12432 हजरत निजामुद्दीन तिरुअनंतपुरम एक्सप्रेस या गाड्या राजापूर रेल्वे स्थानकातून पनवेल मार्गे पुणे सोलापूर या मार्गावरून वळवण्यात आल्या आहेत. तर 19260 भावनगर कोचुवेली एक्सप्रेस ही रत्नागिरी रेल्वे स्टेशनतुन मागे पाठवण्यात येणार आहे. तर 12224 लोकमान्य टिळक एरणाकुलम एक्सप्रेस चिपळूण रेल्वे स्टेशनमधून मागे वळवण्यात आली आहे. 20932 इंदोर जंक्शन कोचिवल्ली एक्सप्रेस, ही गाडी सुरत जळगाव वर्धा या मार्गे वळविण्यात आली आहे. तर रत्नागिरी रेल्वे स्थानकामध्ये उभी असलेली भावनगर टर्मिनस कोचीवली एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने मार्गस्त करण्यात आली आहे. वंदे भारत एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, मांडवी आणि मंगळुरु एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

COMMENTS