Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार

मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून, मुंबईसह कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र राज्यात पुढील पाच दिवस पावसा

शेवगाव तहसिलवर जनशक्ती विकास आघाडीचा मोर्चा
भाजप यापुढे स्वबळावर…जिल्ह्यात 12 आमदार हवेत
निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी चिन्ह बहाल

मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला असून, मुंबईसह कोकणातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 12 जुलैपर्यंत मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. विदर्भामध्ये आज बुधवारी ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भासह कोकणातही पावसाचा जोर वाढणार असून, काही जिल्ह्यात पावसाचा ‘येलो अलर्ट’ तर काही जिल्ह्यात ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. विदर्भासह कोकणात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
मुंबईसह, कोकणात आणि विदर्भातील काही जिल्ह्यात रविवारच्या रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. मंगळवारी दुपारी मुंबईतील पावसाचा जोर ओसरल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येतांना दिसून येत आहे. मुंबईतील लोकलही धावायला लागल्या असल्या तरी, पाऊस सक्रिय असून, पुढील पाच दिवस पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मोसमी पावसाने संपूर्ण विदर्भ व्यापला असला तरीही पावसाने मात्र विदर्भाकडे पाठ फिरवली होती. पश्‍चिम विदर्भात थोडाफार पाऊस झाला पण पूर्व विदर्भात पावसाने दडी मारली होती. अवकाळी पावसाने मात्र विदर्भात तांडव घातले होते. जूनच्या अखेरपर्यंत पाठ फिरवणार पाऊस जुलै पासून हलक्या स्वरूपात कोसळत आहे. समुद्रसपाटीवरील दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टी लगत असलेल्या कमी दाबाचा पट्टा कायम आहे. पुढील पाच दिवस कोकण व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह पावसाची दाट शक्यता आहे.

आसाममध्ये पुरामुळे 85 जणांचा मृत्यू – आसाममध्ये आलेल्या पुरामुळे आणखी सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे पूर, भूस्खलन आणि वादळात मृतांचा आकडा 85 वर पोहोचला आहे. राज्यातील 28 जिल्ह्यांतील 27.74 लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात आतापर्यंत सहा गेंड्यांसह 137 वन्य प्राण्यांनी आपला जीव गमावला आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्र संचालक सोनाली घोष यांनी सांगितले की, आतापर्यंत दोन गेंडे, दोन हत्ती, 84 हॉग डीअर, 3 दलदलीतील हरण, 2 सांबर यांच्यासह 99 प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे. उद्यानातील 233 छावण्यांपैकी 70 वन छावण्या अजूनही तुंबलेल्या आहेत.

COMMENTS