राहुरी ः राहुरी तालुक्यातील मुस्लिम समुदायाचे वतीने बारागाव नांदूर येथील मशिदीत अल्लाह कड़े पावसा साठी साकड़े घालण्यात आले. जून महिना संपून जुलै
राहुरी ः राहुरी तालुक्यातील मुस्लिम समुदायाचे वतीने बारागाव नांदूर येथील मशिदीत अल्लाह कड़े पावसा साठी साकड़े घालण्यात आले. जून महिना संपून जुलै महिना उजाडला जुलै चा पहिला आठवडा ही संपत आला बहुतांश शेतकर्यांनी खरीपाच्या पेरण्या केल्या अनेक ठिकाणी दुबार पेरणीची वेळ शेतकर्यांवर आलेली आहे आधीच संकटात सापडलेला शेतकरी आता आणखी संकटात सापडल्याचे सर्वत्र चित्र दिसून येत आहे या पार्श्वभूमीवर मुळा धरणाखालील बारागाव नांदूर येथे मुस्लिम समाजाच्या वतीने हजरत सैयद शाह वली बाबा यांच्या दरगाहवर पाण्याने भिजलेली चादर टाकून अल्लाहकडे दुआ करण्यात आली. यावेळी उपस्थित मुस्लिम समाजातील नागरिकांनी केली. संपूर्ण महाराष्ट्र भरपूर पाऊस पडो, ज्या वेलेस पावसात खंड पडतो अशा वेळेस अल्लाहचे चहीते वली, अल्लाहचे पैगंबर हजरत मोहम्मद स्वलललाहो अलैही वसल्लम यांच्या वशिलाने अल्लाहकड़े पावसासाठी दुआ केली. या वेळी जामा मशिदीचे मौलाना अनवर, सामाजिक कार्यकर्ते युसूफभाई देशमुख, बाबा पटेल, नसिर भाई देशमुख, आनिस पटेल, अकरम मिरझा, आदींची उपस्थित ही दुआ मागण्यात आली.
COMMENTS