पुणे : मुंबईतील वरळी आणि बीडमधील हिट अॅड रनच्या घटना ताज्या असतांनाच पुण्यात रविवारी मध्यरात्री एका एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अप
पुणे : मुंबईतील वरळी आणि बीडमधील हिट अॅड रनच्या घटना ताज्या असतांनाच पुण्यात रविवारी मध्यरात्री एका एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात एका पोलिस अधिकार्याचा मृ्त्यू झाला आहे. तर एक पोलिस अधिकारी जखमी झाला आहे. हे पोलिस अधिकारी गस्त घालत असताना हा अपघात घडला. या अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला. मात्र, गाडीचा वाहन नंबर पोलिसांना मिळाल्याचे अप्पर पोलिस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांनी सांगितले. तर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी रुबी हॉल रुग्णालयाला भेट दिली आहे. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, कल्यानीनगर येथील हायप्रोफाईल अपघातानंतर देशातील हिट अँड रनची देशभरात चर्चा झाली. अशातच पुन्हा हिट अँड रनची घटना घडल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे. पुण्यात काही महिन्यांपूर्वी पोर्शे कारने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा पुण्यात हिट अँड रनचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पुण्यात काल मध्यरात्री एक भीषण अपघात घडला. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या हॅरिस ब्रीजखाली दोन पोलिस रात्रीची गस्त घालण्यासाठी गेले होते.
खडकी पोलिस ठाण्यात बीट मार्शल म्हणून काम करणारे दोन पोलिस अधिकारी दुचाकीवरुन हॅरिस ब्रीजखाली जात होते. त्यावेळी समोरुन आलेल्या एका वेगवान चारचाकी गाडीने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की यात समाधान कोळी या पोलिस कर्मचार्याचा मृत्यू झाला आहे. तर पी.सी. शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. सध्या शिंदे या पोलिस कर्मचार्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर दुसरीकडे या अपघातानंतर चारचाकी वाहन चालक हा गाडी घेऊन फरार झाला आहे. सध्या पोलिस त्या आरोपीचा शोध घेत आहेत. या अपघातातील गाडी कोणाची होती, ती कोण चालवत होतं, तो व्यक्ती अल्पवयीन होता का? याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
COMMENTS