Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या सभेत गोंधळ

अहमदनगर ः अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटीची सर्वसाधारण सभा टिळक रोड येथील नंदनवन लॉन येथे बँकेचे अध्यक्ष दिलीपराव काटे यांच्या अध्यक्षतेखाली सभा

जुने सोने विकण्यासाठी दोन वर्षांची मुदत द्या ; वर्मा यांची केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे मागणी
सोयाबीन व कापूस अनुदान पात्र शेतकर्‍यांनी अर्ज दाखल करावे
LOK News 24 I अल्पवयीन मुलीवर सलग दोन आठवडे बलात्कार

अहमदनगर ः अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटीची सर्वसाधारण सभा टिळक रोड येथील नंदनवन लॉन येथे बँकेचे अध्यक्ष दिलीपराव काटे यांच्या अध्यक्षतेखाली सभा विविध प्रश्‍नांवरून गोंधळात पार पडली. यावेळी उपस्थित उपाध्यक्ष संजय कोळसे, संचालक अशोक ठुबे, सुरेश मिसाळ, अण्णासाहेब ढगे, चांगले खेमनर, काकासाहेब घुले, ज्ञानेश्‍वर काळे, सूर्यकांत डावखर, धनंजय म्हस्के, आप्पासाहेब शिंदे, बाबासाहेब बोडखे, सत्यवान थोरे, अनिल गायकर, कैलास राहणे, महेंद्र हिंगे, वसंत खेडकर, बाळासाहेब सोनवणे, अशोक कराळे, मनीषा म्हस्के, भाऊसाहेब कचरे, नंदकुमार दिघे, सेक्रेटरी स्वप्निल इथापे आदीसह संचालक व शिक्षक सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बँकेचे सेक्रेटरी स्वप्निल इथापे यांनी अहवाल वाचन केले. व 23 मे 2023 रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त वाचून मागील वर्षाचे मुद्दे आले नाही असे आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले त्यामध्ये संस्थेचा सभासद सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याचे सभासद रद्द होते असे देखील सांगितले परंतु तरीदेखील व्यासपीठावर भाऊसाहेब कचरे हजर होते त्यामुळे त्यांनी तेथे थांबू नये असा पवित्रा अप्पासाहेब शिंदे यांनी घेतला व सभेमध्ये गोंधळाला सुरुवात झाली सभा सुरू महिला शिक्षिकेने व्यासपीठावर येऊन स्वतःवर झालेला अन्यायाची वाचा फोडण्यासाठी सांगितले की, एका शिक्षकाने कर्ज घेतले असून त्यामध्ये जामीनदार म्हणून माझ्या खोटे सह्या केलेले आहे मी त्या संदर्भात अनेक वेळा सोसायटीमध्ये दाद मागितले परंतु मला दाद मिळाली नाही. व याविषयी चेअरमन व्हाईस चेअरमन सत्ताधारी संचालक मंडळ यांनी खुलासा न केल्यास कायदेशीर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे व त्यानंतर सुनील दानवे सर यांनी संचालक निवृत्त होऊन सुद्धा त्यांच्या नावावर कर्ज बाकी कसे काय वास्तविक पाहता संचालक निवृत्त होण्याअगोदर त्याचे सर्व कर्ज भरून त्याने निवृत्त व्हायचे असते सभासदांना वेगळा नियम आणि संचालकांना वेगळा नियम असा पायंडा या ठिकाणी सोसायटीमध्ये चालू आहे या गोष्टीमुळे कर्जदारांचे नावे वाचण्यास सभासदांनी आग्रह केला मात्र चेअरमन दिलीप काटे हे कर्जदारांचे नाव घेण्यास तयार नव्हते परंतु वारंवार मागणी केल्यावर तीन संचालकांची नावे वाचण्यात आली व सर्व सभासदांनी निषेध केला. जामिनदाराच्या  खोट्या सह्या करून कर्ज घेतले जात असल्याचे प्रकार होत असून त्यावरती सर्व सभासदांच्या डिजिटल स्वाक्षरी संगणक प्रणालीत समावेश करण्यात यावा व दिव्यांग सभासदांना दिली जाणारी कर्जावरील व्याजदरातील 1 टक्के सूट वाढवून देण्यात यावी या प्रश्‍नांवर  सभेमध्ये किरकोळ गोंधळ झाला.

COMMENTS