Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाघापूर सरपंचपदी रंजना बराते यांची निवड

अकोले ः राजकीयदृष्टया जागृत असणार्‍या अकोले तालुक्यातील वाघापूर गावच्या सरपंचपदी रंजना महेंद्र बराते यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच पदाच्या निवड

बोठेशी संबंधित ‘त्या’ फोनचा फॉरेन्सिक अहवाल प्रतीक्षेत
पाथर्डीत महिलेबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी गुन्हा दाखल
संगमनेरमध्ये बनावट गॅस रेग्युलेटर जप्त

अकोले ः राजकीयदृष्टया जागृत असणार्‍या अकोले तालुक्यातील वाघापूर गावच्या सरपंचपदी रंजना महेंद्र बराते यांची बिनविरोध निवड झाली. सरपंच पदाच्या निवडीसाठी आज आयोजित केलेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंचपदी सामाजिक कार्यकर्ते महेंद्र बाराते यांच्या पत्नी रंजना बराते या प्रगतशील शेतकरी महेंद्र बराटे यांच्या पत्नी आहे. सामाजिक वारसा घेऊन आपण गावच्या विकासाठी प्रयत्न करणार असल्याचे रंजना बराते यांनी सांगितले. त्यांची निवड झाल्याचे जाहीर करतात  त्यांच्या निवडीचे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. ग्रामस्थ तसेच परिसरातील अनेक मान्यवरांनी त्यांचा यावेळी सत्कार केला. यावेळी भाऊसाहेब लांडे, मनीषा वामन, रवींद्र शेंगाळ, भाऊसाहेब लांडे, सीमा लांडे, रोहिणी औटी, मंदाताई बराते, कुसुम गंभीरे, भाऊसाहेब बराते, देवराम लांडे, भाऊसाहेब रकटे, सिताराम लांडे, म्हतु लांडे, भीमा लांडे, सुभाष औटी, महादू लांडे, भीमराज रकटे, अण्णासाहेब रकटे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

COMMENTS