Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खोटा चेक दिल्याने कर्जदारास शिक्षा

कोपरगाव शहर ः कोपरगाव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्था यांचेकडून कर्जदार अनिल तानाजी खैरे यांनी घेतलेल्या कर्जाचे परत फेडीपोटी पतसंस्थेला दिलेला 20

..आणि, भिल्ल वस्तीत तब्बल 50 वर्षांनी आले हक्काचे पाणी
अन्यथा गढूळ पाणी मुख्याधिकारी यांना पिण्यास भाग पाडू – दत्ता काले
बदलापूर घटनेचा बेलापूरात विविध संघटनानी केला निषेध

कोपरगाव शहर ः कोपरगाव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्था यांचेकडून कर्जदार अनिल तानाजी खैरे यांनी घेतलेल्या कर्जाचे परत फेडीपोटी पतसंस्थेला दिलेला 20 लाख रुपयाचा चेक न वटल्याने पतसंस्थेने त्यांचेवर रितसर कोपरगांव येथील न्यायालयात फौजदारी गुन्हा एस.सी.सी.नं.306/2019 दाखल केला होता. त्यामध्ये चौकशीअंती आरोपी अनिल तानाजी खैरे यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने कोपरगाव येथील न्यायाधीश भगवान धों.पंडित यांनी आरोपीस 6 महिन्याची साधी कैदेची शिक्षा ठोठावली तसेच फिर्यादी ज्योती सहकारी पतसंस्थेस 25 लाख रुपयाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला तसेच नुकसान भरपाईची रक्कम एक महिन्यात पतसंस्थेस न दिल्यास आरोपीस पुन्हा 6 महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे. याकामी अ‍ॅडव्होकेट एस डी. काटकर यांनी कामकाज पाहिले.

COMMENTS