रस्ते खोदाईने शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्ते खोदाईने शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी

शहरात पावसाळी हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व रस्ते पूर्ववत करण्याच्या धोरणाकडे दुर्लक्ष करून कामे सुरूच ठेवल्याचा फटका ’अनलॉक’च्या पहिल्या दोन दिवसांमध्येच नागरिकांना बसला. रस्तोरस्ती केलेल्या खोदकामांमुळे शहरात ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि पावसामुळे होणारा चिखल यामुळे अपघातांचा धोका वाढण्याची जाणीव

महसूल ची कार्यवाही बळेगाव येथील चार वाळू तस्कंराविरुद्धात गोंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अलविदा काॅम्रेड !
शिक्षकांना जुनी पेन्शनकरिता शासनस्तरावर पाठपुरावा करु – पालकमंत्री बच्चू कडू

मुंबई/प्रतिनिधीः शहरात पावसाळी हंगाम सुरू होण्यापूर्वी सर्व रस्ते पूर्ववत करण्याच्या धोरणाकडे दुर्लक्ष करून कामे सुरूच ठेवल्याचा फटका ’अनलॉक’च्या पहिल्या दोन दिवसांमध्येच नागरिकांना बसला. रस्तोरस्ती केलेल्या खोदकामांमुळे शहरात ठिकठिकाणी होणारी वाहतूक कोंडी आणि पावसामुळे होणारा चिखल यामुळे अपघातांचा धोका वाढण्याची जाणीव झाल्याने अखेर महापालिकेने ’आहे त्या स्थितीत’ कामे थांबविण्याचे आदेश दिले आहेत. नव्याने खोदकाम न करता ताबडतोब रस्ते पूर्ववत करून घ्यावेत, अशा सूचना अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या आहेत.

महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची खोदकामे 15 मेपर्यंत पूर्ण करून त्यानंतर रस्ते पूर्ववत करण्यास दर वर्षी प्राधान्य दिले जाते. यंदा समान पाणीपुरवठा योजनेसाठी जलवाहिन्यांची आणि त्याचप्रमाणे शहराच्या जुन्या भागांत जीर्ण झालेल्या सांडपाणी वाहिन्या बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले गेले. मे अखेरपर्यंत शहरात कडक निर्बंध असल्याने महानगरपालिकेने एकाचवेळी अनेक रस्ते खोदले. रस्ते खोदल्यानंतर एक जूनपर्यंत त्याचे पुनर्डांबरीकरण किंवा डागडुजी होणे गरजेचे होते. दुर्दैवाने बर्‍याच भागांतील रस्त्यांची कामे अर्धवट स्थितीत होती. त्यातच एक जूनपासून सर्व दुकाने दोनपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली गेल्याने रस्त्यावरील वर्दळ वाढली. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागांत प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. त्याशिवाय, तात्पुरते डांबरीकरण किंवा काँक्रिट टाकलेल्या भागांत पावसामुळे रस्त्यावर चिखल साठण्याचे, रस्ते निसरडे झाल्याचे चित्र दिसून आले. महापालिकेच्या नियोजनशून्यतेचा फटका नागरिकांना सहन करावा लागत असल्याने त्याबाबत पथ विभागासह पदाधिकार्‍यांकडे तक्रारी करण्यात आल्या. अखेर, महापालिकेला खोदलेल्या रस्त्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याचे लक्षात आले असून, सर्व कामे तातडीने थांबविण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी काढले आहेत. नव्याने खोदकाम थांबविण्यासह राडारोडाही त्वरित हटविण्यात येत आहे. या कामासाठीचे पुढील खोदकाम पावसाळ्यानंतर केले जाईल, असेही अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले. गेल्या दोन-तीन दिवसांत खोदकामाचा रस्त्यावर साठलेला राडारोडा; तसेच रस्त्याची दुरुस्ती केल्यानंतरही जोराच्या पावसामुळे तेथे लगेच खड्डे पडण्याचे प्रकार घडले. याबाबत माध्यमांनी आवाज उठविला होता. खड्डे आणि पावसामुळे रस्ते खचण्याचे प्रकार होत असून, त्यातून बदनामी होत असल्याचा साक्षात्कारही महापालिकेला झाला. त्यामुळे ही सर्व कामे तातडीने थांबविण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. नवीन खोदकामे तातडीने थांबवून सर्व रस्त्यांची डागडुजी आठ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. पावसात डांबर उखडले गेल्यास संबंधित कंत्राटदाराच्या खर्चानेच त्याची दुरुस्ती करून घेण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

COMMENTS