Homeताज्या बातम्याविदेश

ब्रिटनमध्ये 14 वर्षांनंतर राजकीय सत्तांतर

ऋषी सुनक यांचा पराभव ; कीर स्टार्मर होणार नवे पंतप्रधान

लंडन/वृत्तसंस्था ः ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, या निवडणुकीत पंतप्रधान ऋषी सुनक यांचा सत्ताधारी असलेल्या कन्झर्व्हेटिव्

इस्लामपूरात दूषीत पाणी पुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात : सुजित थोरात
संभाजीनगर मध्ये होणार्‍या पांढरे वाळ महामोर्चात लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे- पत्रकार विष्णु राठोड
बिअर बारमध्ये वेटर आणि ग्राहकाची फ्री-स्टाईल हाणामारी; VIDEO आला समोर| LOK News 24

लंडन/वृत्तसंस्था ः ब्रिटनमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, या निवडणुकीत पंतप्रधान ऋषी सुनक यांचा सत्ताधारी असलेल्या कन्झर्व्हेटिव्ह पक्षाला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या निवडणुकीची मतमोजणीमध्ये किर स्टार्मर यांच्या मजूर पक्षाने 410 जागा जिंकल्या आहेत, तर पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला केवळ 119 जागा मिळवत्या आल्या आहेत. एकूण 650 जागांपैकी 513 जागांचा निकाल हाती आले आहे. त्यामुळे या निवडणुकीत ऋषी सुनक यांचा पराभव झाला असून कीर स्टार्मर होणार नवे पंतप्रधान होणार असल्याचे दिसून येत आहे.
ब्रिटनमध्ये गेल्या 14 वर्षांपासून सत्तेत असलेला हुजूर पक्ष आणि प्रमुख विरोधी मजूर पक्ष हे दोन मोठे पक्ष ब्रिटनमध्ये आहेत. तेथील सत्ता ही या दोन पक्षांपैकी एकाकडे असते. त्यातही हुजूर पक्षाला सत्तेत राहण्याची सर्वाधिक संधी ब्रिटनच्या जनतेने दिली आहे. सध्या हुजूर पक्षाचे नेतृत्व सुनक यांच्याकडे, तर मजूर पक्षाची धुरा एप्रिल 2020 पासून स्टार्मर यांच्याकडे आहे. तर, स्टार्मर यांनी या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलं असून सुनक यांच्या पक्षाला दारूण पराभव चाखावा लागला आहे. त्यामुळे लेबर पार्टीचे नेते, विरोधी पक्षनेते कीर स्टार्मर हे आता ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार आहे. या निवडणुकीत स्टार्मर यांनी लेबर पार्टीच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले होते. ब्रिटनच्या संसदेत एकूण 650 जागा असून कोणत्याही राजकीय पक्षाला बहुमत प्रस्थापित करण्यासाठी 326 जागा जिंकण्याची आवश्यकता असते. सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचा गेल्या दोन वर्षांचा कारभार आणि उलथापालथ पाहता यादरम्यान अनेक वाद निर्माण झाले होते. त्यात पंतप्रधानांची तडकाफडकी बदलने असो, ब्रिटनची ढासळलेली अर्थव्यवस्था आणि कोव्हिड-19 साथीचे ढिसाळ व्यवस्थापन हे निवडणुकीतील प्रचाराचे महत्त्वाचे मुद्दे ठरले होते. मावळते पंतप्रधान ऋषी सुनक यांचा पराभव होण्यासाठी हे मुद्दे कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते. कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखालील लेबर पक्षाने आतापर्यंत 400 पेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे कीर स्टार्मर ब्रिटनचे नवे पंतप्रधान होणार असून, लेबर सरकारच्या काळात पक्षाच्या नेत्या अँजेला रायनर यांना उपपंतप्रधानपद दिले जाण्याची शक्यता आहे, तर अर्थतज्ज्ञ रेचल रीव्ह्स यांना अर्थमंत्री पद दिले जाण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीचा पराभव स्वीकारताना ऋषी सुनक यांनी जनादेशाचे वर्णन विचारपूर्वक निर्णय असे केले आहे. त्यांनी आत्मनिरीक्षण आणि परिणामांमधून शिकण्याच्या महत्त्वावर भर दिला. आज, सत्ता सुरळीतपणे आणि शांततेने बदलेल, ज्यामध्ये सर्व पक्षांच्या सदिच्छा सहभागी आहेत, असं सुनक म्हणाले. मी नुकसानीची संपूर्ण जबाबदारी घेतो आणि ब्रिटीश लोकांनी दिलेला महत्त्वपूर्ण संदेश समजतो. आत्मसात करण्यासारखे आणि विचार करण्यासारखे बरेच काही आहे.
ऋषी सुनक, ब्रिटनचे माजी पंतप्रधान

COMMENTS