Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ड्रोन फिरत असल्याचे पाहिले ; पाठलाग करून दुचाकी हस्तगत

कर्जत : कर्जत तालुक्यातील हिंगणगाव परिसरात शनिवारी रात्री ड्रोन फिरत असल्याचे ग्रामस्थांना पाहायला मिळाले. यावेळी त्याची शहानिशा करण्यासाठी गेले

हिंदुंवर अत्याचार करणाऱ्यांचे डोळे काढू ; नितेश राणे
शिक्षक कॉलनीतील धोकादायक विज लाईन थांबवा : नागरिकांचा उपोषणाचा इशारा
अ‍ॅड. प्रकाश संसारे यांची नियुक्ती

कर्जत : कर्जत तालुक्यातील हिंगणगाव परिसरात शनिवारी रात्री ड्रोन फिरत असल्याचे ग्रामस्थांना पाहायला मिळाले. यावेळी त्याची शहानिशा करण्यासाठी गेले असता ग्रामस्थांना विना नंबर प्लेटची एक दुचाकी आढळून आली. याबाबत अधिक माहिती अशी, हिंगणगाव परिसरात शनिवारी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास ड्रोन फिरत असल्याचे पाहायला मिळाले. यावेळी इतर गाड्यांचा पाठलाग करत असताना एक विना नंबर प्लेट दुचाकी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शिंदे यांनी यावेळी तात्काळ कर्जत पोलीस स्टेशनशी संपर्क करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली. या परिसरात जोपर्यंत ड्रोनचे वातावरण आहे, तोपर्यंत पोलिसांनी राऊंड मारावा व मिळालेल्या दुचाकीची शहानिशा करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शिंदे, किरण भवाळ, संतोष रंधवे, लखन चव्हाण, मच्छिंद्र रंधवे यांनी केली आहे. 

COMMENTS