अकोले ः अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीने कालकथित दादासाहेब रुपवते यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांचे नाव विज्ञान शाखेला देऊबी त्यांचा सन्मान केला.त
अकोले ः अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीने कालकथित दादासाहेब रुपवते यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांचे नाव विज्ञान शाखेला देऊबी त्यांचा सन्मान केला.त्याच प्रमाणे लोकनेते माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचेही योगदान असल्याने त्यांचे नाव वाणिज्य शाखेला देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शांताराम संगारे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर व सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख यांना मागणीचे निवेदन दिले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्करराव शेळके व शिक्षणाधिकारी संपतराव मालुंजकर उपस्थित होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अकोले महाविद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असून या निमित्ताने माजी आदिवासी विकास मंत्री यांचे शिक्षण क्षेत्रासाठी असलेले मोठे योगदान लक्षात घेऊन त्यांचे नाव महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेला द्यावे. तसेच या निवेदनात त्यांनी मागासवर्गीय विद्यार्थी- विद्यार्थीनीचे असलेले प्रश्न संस्थेने सोडवावे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कमी गुण मिळत असल्याने त्यांना प्रवेश मिळण्यास अडचणी निर्माण होत असून त्यांच्यासाठी प्रवेश संख्येत सेश वाढवावा अशी मागणी शांताराम संगारे यांनी केली. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित अकोले महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेला लोकनेते मधुकरराव पिचड यांचे नाव देण्याच्या मागणीला पाठींबा मिळत असून नाव देण्यासाठी जोर वाढत आहे.
COMMENTS