Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबई सत्र न्यायालयातील न्या. राहुल रोकडे यांची तडकाफडकी बदली

शिखर बँक घोटाळा, भोसरी भूखंड गैरव्यवहाराचा सुनावणार होते निकाल

मुंबई : मुंबई विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निगडित 25 हजार

Sangamner : मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना फी माफ करून दिलासा द्या (Video)
जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख अचानक सोनईत दाखल
शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर | LokNews24

मुंबई : मुंबई विशेष सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी निगडित 25 हजार कोटी रुपयांचा शिखर बँक घोटाळा प्रकरणातील निकाल रोकडे हे सुनावणार होते. येत्या 12 जुलैला या प्रकरणाची सुनावणी होणार होती. मात्र, त्याआधीच त्यांची मुंबई सत्र न्यायालयातून दिंडोशी सत्र न्यायालयात बदली करण्यात आली आहे.
न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर राज्यातील सत्ताधारी आमदार, मंत्र्यांविरोधातील सारे महत्त्वाचे खटले सध्या अंतिम टप्यात आहेत. अशातच राहुल रोकडे यांची मुंबई सत्र न्यायालयातून दिंडोशी सत्र न्यायालयात बदली झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सहभाग असलेला 25 हजार कोटींचा शिखर बँक घोटाळा, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित महाराष्ट्र सदन व कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा, एकनाथ खडसे हे आरोपी असलेला भोसरी भूखंड गैरव्यवहार, अनिल देशमुखांविरोधील खटला, राणा दांपत्याविरोधातील हनुमान चालिसा प्रकरण, इत्यादी प्रकरणं सध्या अंतिम टप्प्यात आहेत. हे सर्व महत्वाचे खटले न्यायाधीश राहुल रोकडे  यांच्यासमोर आहेत.  काही दिवसांपूर्वी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 3 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. तर राज्य मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळ्यात छगन भुजबळ यांना वॉरंटचा इशाराही दिला होता. तसेच शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांना मुंबई पोलिसांनी दिलेली ’क्लीन चीट’ ईडीच्या विरोधामुळे प्रलिंबित आहे. येत्या सोमवारी दिंडोशी येथील सत्र न्यायालयात ते पदभार स्वीकारणार आहेत.

COMMENTS