Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिव्यांगांना अंत्योदय योजनेप्रमाणे धान्य मिळणार

सावली दिव्यांग संघटनेच्या आंदोलनाला यश : चाँद शेख

शेवगाव तालुका ः शेवगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना  तहसील कार्यालय शेवगाव यांचेकडून  शिधापत्रिका अडचणी बाबत सावली संघटनेकडून दिव्यांगांना दुबा

बिर्‍हाड पदयात्रेच्या इशार्‍याने भटक्यांच्या मदारी वसाहतीच्या कामाला सुरुवात
पेटीएमचे कर्मचारी सांगून दोन व्यावसायिकांची फसवणूक
अवैध दारूची वाहतूक करणारे जेरबंद

शेवगाव तालुका ः शेवगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना  तहसील कार्यालय शेवगाव यांचेकडून  शिधापत्रिका अडचणी बाबत सावली संघटनेकडून दिव्यांगांना दुबार शिधापत्रिका देणे, शिधापत्रिका ऑनलाईन करून दिव्यांग बांधवाना अंत्योदय धान्य चालू करणे, दिव्यांगगांना नवीन शिधापत्रिका देणे कुटुंबातील सदस्य यांचे नावे ऑनलाईन समाविष्ट करणे या मागण्यासाठी सावली दिव्यांग संघटनेच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
यावेळी सावली दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सावली दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष चांद शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन बाबत मा प्रशांत सांगडे तहसीलदार शेवगाव यांच्याशी सावली संघटनेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव यांची चर्चा घडून आली असता दिव्यांगांच्या शिधापत्रिका बाबत असलेल्या मागण्या मान्य करून शेवगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवांना सर्वोतपरी मदत करण्याबात पुरवठा निरीक्षक मंगल पवार मॅडम यांना सांगीतले. पुरवठा निरीक्षक पवार यांनी दिव्यांग बांधवांचे कागदपत्रे घेऊन लवकरच योग्य कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. दिव्यांग बाधवांच्या मागण्यांना यश मिळाल्याने सर्व दिव्यांग बांधवामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी अध्यक्ष चाँद शेख,उपाध्यक्ष संभाजी, सचिव नवनाथ औटी, संघटक खलील शेख, सह संघटक अनिल विघ्ने, अतिष अंगरख, किशोर अंगरख, महबूब सय्यद, बाबासाहेब गडाख, गोवर्धन वांढेकर यांच्यासह दिव्यांग बांधव उपस्थित होते.

शेवगाव तालुक्यातील सर्व शिधापत्रिका धारकांनी स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जाऊन कुटुंबातील सर्वं सदस्य यांची ई केवायसी करून घेणेबाबत आवाहन मा तहसीलदार साहेब शेवगाव यांनी केली आहे. शेवगाव तालुक्यातील दिव्यांग बांधवानी देखील स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जाऊन आपली व आपल्या कुटुंबातील सदस्यांची ईकेवायसी म्हणजेच कुटुंबातील सर्वांनी स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे जाऊन थम द्यावा.
चाँद कादर शेख, अध्यक्ष सावली दिव्यांग संघटना शेवगाव तालुका

COMMENTS