श्रीरामपूर : मेडीकल शिक्षणाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट-2024 या परीक्षेत मोठा गैरप्रकार झाला असून राज्यातील काही विद्यार्थ्यांना ग्रेसम
श्रीरामपूर : मेडीकल शिक्षणाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट-2024 या परीक्षेत मोठा गैरप्रकार झाला असून राज्यातील काही विद्यार्थ्यांना ग्रेसमार्क देण्यात आले. यामुळे प्रामाणिक व पात्र विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला असून या विरोधात माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील लोकसेवा विकास आघाडी यांच्या वतीने सोमवारी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले.
एनटीएने घेतलेल्या नीट परीक्षेत प्रचंड अनागोंदी व गैरप्रकार झालेला आहे. यामुळे देशभरातील 24 लाख विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. देशात नीट परीक्षेच्या पेपर फुटीपासून ते ग्रेस मार्क्स देण्यापर्यंत सार्याच गोष्टी उघड झाल्याने हा घोटाळा विध्यार्थ्याचा भविष्याशी खेळणारा असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे ही परीक्षा रद्द करून पुन्हा एकदा पारदर्शी परीक्षा घ्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, अशोक कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, संचालिका मंजुश्रीताई मुरकुटे, संचालक विरेश गलांडे, ज्ञानेश्वर काळे, लोकसेवा विकास आघाडीचे शहराध्यक्ष नाना पाटील, प्राचार्या डॉ. सुनिताताई गायकवाड, बाजार समितीचे संचालक मयूर पटारे, गणेश छल्लारे, शिवाजी मुठे, अॅड्.उमेश लटमाळे, प्रमोद करंडे, संदीप डावखर, नाना गांगड, गणेश भाकरे, साहेबराव गायकवाड, कैलास भागवत, सागर अमोलिक, चागदेव जाधव, दीपक झुराळे, बबन आसने, प्राचार्य अंजाबापू शिंदे, प्राचार्य प्रसाद कोते, प्राचार्य रईस शेख, प्राचार्य संपत देसाई, प्रा.सुयोग थोरात, प्रा. रविंद्र वारुळे, प्रा.नानासाहेब शिरोळे, प्रा. सुनील औताडे, प्रा. मोहिनी अल्हाट, बाबासाहेब पटारे, प्रा. विशाल घोगरे, प्रा. चेतक गंगावने, प्रा.महेश डोंगरे, प्रा. गोकुळ पावडे, प्रा. सागर थोरात, निलेश शेंडे आदीसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS