Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशमुख महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात

अकोले ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व अ‍ॅड. एम. एन. देशमुख कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजूर येथील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय

देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यशाळा उत्साहात
देशमुख महाविद्यालयात वाड्.मय मंडळाचे उद्घाटन
देशमुख महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन उत्साहात

अकोले ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व अ‍ॅड. एम. एन. देशमुख कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राजूर येथील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना, व विद्यार्थी विकास विभाग यांचे संयुक्त विद्यमाने 21 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात योगाचार्य श्री शाम पवार यांनी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी महाविद्यालयातील प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बबन थोरात यांनी केले.यावेळी प्राचार्य डॉ भाऊसाहेब देशमुख यांनी योगासन करण्याचे फायदे स्पष्ट करून दिवसभरातील किमान एक तास हा  व्यायामासाठी देणे आवश्यक आहे असे त्यांनी यावेळी मत व्यक्त केले. प्रा. रोहीत मुठे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय देशमुख, डॉ. व्ही.एन. गिते, आढारी, यांनी विषेश परिश्रम घेतले.

COMMENTS