Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थ्यांना थेट शाळेतच एसटी पासचे वाटप

कोपरगाव बस आगाराचा उपक्रम विद्यार्थ्यांनी केले स्वागत

कोपरगाव शहर ः ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी ये जा करण्यासाठी एसटी महामंडळाकडून विद्यार्

परिचारीका भगिनीच ख-या तारणहार-विवेकभैय्या कोल्हे
के.जे.सोमैया महाविद्यालयात ’डोळ्यांची काळजी’ विषयावर व्याख्यान  
मुळा नदीवरील मानोरी केंदळ पुल पावसामुळे कोसळला

कोपरगाव शहर ः ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तालुक्याच्या गावी ये जा करण्यासाठी एसटी महामंडळाकडून विद्यार्थ्यांना मासिक भाड्याच्या तुलनेत 33% टक्के रक्कम भरून सवलतीच्या दरात बस पास मिळत असतो परंतु हा पास मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय महाविद्यालयीन तासिका बुडवून तासनतास एस टी डेपो कार्यालयात रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व वेळेचे नुकसान होते. यापासून सुटका मिळावी या उद्देशाने राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळांने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना थेट शाळेत महाविद्यालयातच सवलतीच्या दरात बस पास वाटप करण्यात येणार आहे.
याच पार्श्‍वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव राज्य परिवहन आगारातर्फे देखील मंगळवार दिनांक 18 जून पासून कोपरगाव तालुक्यातील वेगवेगळ्या महाविद्यालय शाळेमध्ये शिक्षणासाठी ग्रामीण भागातून बस ने प्रवास करणार्‍या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बस पास वाटप सुरू करण्यात आले असून यासाठी कोपरगाव आगार प्रमुख अमोल बनकर यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव बस आगार कर्मचार्‍यांनी नुकतीच तालुक्यातील श्री संत गंगागिरी महाराज महाविद्यालय,के जे सोमय्या महाविद्यालय तसेच कोळपेवाडी येथील राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर आदी शाळा महाविद्यालयात प्रत्यक्षात भेट देत तेथील एसटी बसने येजा करणार्‍या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात जागेवरच सर्व कागदपत्रांची पूर्तता करत  बस पासचे वाटप करण्यात आले. या मोहिमेत कोपरगाव बस आगार प्रमुख अमोल बनकर,विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी तथा पालक अधिकारी कोपरगाव नितीन गटणे, स.वा अधीक्षक योगेश दिघे, वाहतूक नियंत्रक गौतम खरात, प्रकाश हिरे आदि कोपरगाव एसटी आगाराचे अधिकारी कर्मचार्‍यांनी तालुक्यातील वेगवेगळ्या शाळेत महाविद्यालयात भेटी देत प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक विद्यार्थ्यांना शासनाच्या जागेवरच बस पास वितरित करण्याच्या मोहिमेविषयी मार्गदर्शन केले.

तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयात एस.टी बस ने शिक्षण घेण्यासाठी ये जा करणार्‍या सर्वच विद्यार्थ्यांना थेट त्यांचाच शाळेत महाविद्यालयात जाऊन सवलतीच्या दरात बस पास चे वाटप करण्यात येणार आहे.
अमोल बनकर, आगार प्रमुख कोपरगाव.

COMMENTS