शिक्रापूर प्रतिनिधी - शिक्रापूर ता. शिरुर येथे एका इसमाने दारुच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन य

शिक्रापूर प्रतिनिधी – शिक्रापूर ता. शिरुर येथे एका इसमाने दारुच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्रापूर ता. शिरुर येथील गणेश कांबळे हे १६ जून रोजी सायंकाळच्या सुमारास दारु पिऊन घरी आले त्यांनी पत्नी रेश्मा सोबत वाद घालण्यास सुरुवात केली, दरम्यान पत्नी शेजाऱ्यांच्या घरात जाऊन बसली काही वेळाने रेश्मा घरात आली असता तिला गणेश यांनी घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले, यावेळी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गणेश सतीश कांबळे वय ४२ वर्षे रा. विठ्ठल मंदिर जवळ शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले, याबाबत रेश्मा गणेश कांबळे वय ३० वर्षे रा. विठ्ठल मंदिर जवळ शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बापू हाडगळे हे करत आहे.
COMMENTS