Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शहीद प्रदीप ताथवडेंची पुण्यतिथी शहीद दिनाने साजरी

शिक्रापूर प्रतिनिधी - केंदूर ता. शिरुर येथील भूमिपुत्र शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या स्मारक स्थळावर शहीद मेज

उपाशीपोटी उन्हात राहिल्यामुळेच मृत्यू
महावितरणमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी
चक्क ! पूराच्या पाण्यात थर्माकॉलवर बसून नवरदेव गेला लग्नाला.

शिक्रापूर प्रतिनिधी – केंदूर ता. शिरुर येथील भूमिपुत्र शहीद मेजर प्रदीप ताथवडे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांच्या स्मारक स्थळावर शहीद मेजर प्रदीप ताथवडेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत आदरांजली अर्पण करुन पुण्यतिथी शहीद दिन म्हणून साजरी करण्यात आली आहे. केंदूर ता. शिरुर गावचे सुपुत्र प्रदीप ताथवडे हे १७ जून २००० रोजी पुंछ सीमेवर अतिरेक्यांविरुद्ध लढत असताना त्यांनी स्वःत तीन अतिरेक्यांचा खातमा केला, त्यांनतर अतिरेक्यांच्या हल्य्यात ते जखमी झाले मात्र जखमी होऊन देखील त्यांनी त्यांची अतिरेक्यांशी लढत सुरु ठेवून राहिलेले दोन अतिरेकी देखील संपवले दरम्यान त्यांना वीरमरण आल्याने शासनाने त्यांना मरणोत्तर कीर्ती चक्र बहाल केले तर केंदूर येथे त्यांचे स्मारक उभारले असून आज त्यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली, यावेळी सरपंच अमोल थिटे, माजी सरपंच सुर्यकांत थिटे, रामशेठ साकोरे, प्राचार्य अनिल साकोरे, पांडुरंग ताथवडे, भरत साकोरे, बन्सी पऱ्हाड, बाळासाहेब ताठे, बाबुराव साकोरे, लक्ष्मण भोसुरे, महादेव पाटील, शिवाजी ताथवडे, आदर्श शिक्षक संजय जोहरे यांसह आदी उपस्थित होते. यावेळी शहीद मेजर प्रदीप ताथवडेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली अर्पण करत पुण्यतिथी शहीद दिन म्हणून साजरी करण्यात आली आहे.

COMMENTS