जालना : राज्यात मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेत असतांना, ओबीसी आरक्षणावर गदा येवू नये, यासाठी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके या

जालना : राज्यात मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेत असतांना, ओबीसी आरक्षणावर गदा येवू नये, यासाठी ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषणाचा सुरू केले आहे. मात्र या उपोषणामुळे त्यांची तब्बेत बिघडली आहे. मंगळवारी या उपोषणाचा सहावा दिवस होता, यादिवशी त्यांच्या शरीरातील साखर आणि पाणी कमी झाल्यामुळे त्यांची तब्बेत बिघडवली आहे. ओबीसी समजााच्या न्याय व हक्कासाठी आपलं उपोषण आहे, असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी 6 दिवसांपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यातच, गेल्या 2 दिवसांपासून पाणी पिणेही बंद केले आहेत. त्यामुळे, त्यांची प्रकृती बिघडत चालली असून अशक्तपणाही आला आहे. लक्ष्मण हाके यांच्या शरीरातील शुगर आणि पाणीपातळी खालावली, चक्कर येत असल्याने डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांना उपचाराचा आग्रह करण्यात आला. मात्र, हाके यांच्याकडून उपचार घेण्यास नकार देण्यात आला आहे. तर, डॉक्टरांनी सलाईन लावण्याची विनंती केली, पण सलाईन घेण्यासही त्यांनी नकार देत आपले प्राणांतिक उपोषण सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे, ओबीसी समाज बांधवांकडून हाके यांच्या उपोषणस्थळी गर्दी होत आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस असून जिल्हा शल्य चिकित्सकाच्या पथकाने उपोषणस्थळी जाऊन त्यांच्या शारिरीक प्रकृतीची तपासणी केली. हाके यांच्या शरिरातील शुगर आणि पाणी पातळी खालवल्यामुळे त्यांना चक्कर येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान त्यांना उपचाराची गरज असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. मात्र, डॉक्टरांच्या आग्रहानंतरही हाके यांनी उपचारास नकार दिला. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला राज्यभरातून पाठिंब वाढत असून बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही सोमवारी रात्री उपोषणस्थळी भेट देऊन आपली भूमिका मांडली.
COMMENTS