शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून होणार साजरा : हसन मुश्रीफ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून होणार साजरा : हसन मुश्रीफ

छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिनांक ०६ जून १६७४ रोजी हे रयतेचे राज्य शाश्वत, चिरंतर रहावे म्हणून स्वत:चा राज्यभिषेक करुन घेतला तोच हा दिवस शिवराज्यभिषेक दिन आहे.

अवगुण सोडून सद्गुण धारण करणे हिच गुरुदक्षिणा ः  सरला दीदी
शेवगावमध्ये हमालाचा असाही प्रामाणिकपणा
कोल्हे यांनी स्वतःच्याच नगरसेवकांना फसवून-अंधारात ठेवून माझ्याकडे अर्ज दिला-नगराध्यक्ष वहाडणे

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींवर भगव्या स्वराज्यध्वजासह उभारणार शिवशक राजदंड स्वराज्य गुढी

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिनांक ०६ जून १६७४ रोजी हे रयतेचे राज्य शाश्वत, चिरंतर रहावे म्हणून स्वत:चा राज्यभिषेक करुन घेतला तोच हा दिवस शिवराज्यभिषेक दिन आहे. याच दिवशी श्री शिवराज्यभिषेक शकाची निर्मिती करुन महाराज शककर्ते ही झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वत:चा राज्यभिषेक करुन घेतलेला हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे.

     त्यामुळेच या दिवसाचे महत्व आणखी दृढ होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक 6 जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये सकाळी ९ वाजता सर्व पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी भगव्या स्वराज्यध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करावे असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्हा परिषद इमारतीचे आवारामध्ये रविवारी सकाळी ९ वाजता होणार आहे. शिवशक राजदंड स्वराज्यगुढी यावेळी उभारण्यात येणार असून याचवेळी अहमदनगर जिल्हा परिषद स्थापनेस ६० वर्षे पूर्ण झाल्याने जिल्हा परिषद हीरक महोत्सवाचा शुभारंभ आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अहमदनगर यांच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत जिल्हयातील स्वयंसहाय्यता गटांच्या उत्पादनांचे ऑनलाईन शॉपींगसाठी साईज्योत ई मार्केट प्लेस  या अॅपचा शुभारंभ पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील, उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, विविध विषय समिती सभापती सर्वश्री सुनील गडाख, काशीनाथ दाते, उमेश परिहर, मिराताई शेटे,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  प्रमुख उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करुन होणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली. शिवसुराज्य दिनाच्या कार्यक्रमाबरोबरच महिला बचत गटाच्‍या ऑनलाईन शॉपींग मॉलचा लोकार्पण सोहळा होणार आहे. जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला बचत गटांच्या उत्पादनांना शाश्वत बाजारपेठ मिळवून देण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग मॉलच्या www.saijyoti.org या संकेतस्थळाचा शुभारंभ यावेळी करण्यात येणार आहे. 

COMMENTS