Homeताज्या बातम्यादेश

प्रियंका गांधी लढणार वायनाडमधून लोकसभा

नवी दिल्ली ः काँगे्रस नेते  राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तरप्रदेशातील रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून निवडून आल्यामुळे राहुल गांधी यांनी वा

शरद पवारांना धक्का; कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे रामदास तडस
पैसे दिले नाही म्हणून वर्गमित्राच्या आईसोबत धक्कादायक कृत्य | LOK News 24
महाराष्ट्राला सतर्क राहण्याच्या सूचना : डॉ. भारती पवार | LOKNews24

नवी दिल्ली ः काँगे्रस नेते  राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तरप्रदेशातील रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून निवडून आल्यामुळे राहुल गांधी यांनी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा देणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात पुन्हा पोटनिवडणूक होणार असून, याठिकाणावरून काँगे्रस नेत्या प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. रायबरेली आणि वायनाड या दोन मतदारसंघापैकी एक मतदारसंघ सोडावा लागणार असल्याने राहुल गांधी हे मोठ्या धर्म संकटात सापडले आहेत. मागील निवडणुकीत राहुल गांधी अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते. तर वायनाडच्या जनतेने त्यांना साथ दिली होती. याचदरम्यान, राहुल गांधी म्हणाले की, ’तुम्ही मला कुटुंबातील सदस्यांप्रमाणे प्रेम केले. मी तुमचं प्रेम आयुष्यभर विसरू शकत नसल्याचे वक्तव्य केले होते.  राहुल गांधी यांच्या विधानामुळे ते वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडण्याची शक्यता अनेकांना वाटत आहे. त्यामुळे राहुल गांधी रायबरेलीतून खासदार कायम राहतील असे बोलले जात आहे. सोनिया गांधी यांच्या सल्ल्यानुसार राहुल गांधी हे रायबरेली मतदारसंघ सोडणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघ सोडणार असल्याची चर्चा आहे. राहुल गांधी यांनी दोनपैकी कोणत्याही एका जागेचा राजीनामा दिल्यास त्या ठिकाणी पोटनिवडणूक होईल. त्यापैकी एका जागेवरून प्रियंका गांधी लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायबरेली बरोबर वायनाड लोकसभा मतदारसंघही गांधी कुटुंबाकडे राहील, अशी चर्चा आहे. यामुळे दक्षिण भारत आणि उत्तर भारताचं संतुलन राहील. केरळमध्ये काँग्रेस चांगली कामगिरी करत आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षानेही लोकसभेत चांगली कामगिरी केली.

COMMENTS