Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरच्या जिरीबामचे शेकडो लोक छावण्यांमध्ये

इम्फाळ ः मणिपूर राज्यातील हिंसाचार पुन्हा एकदा उफाळून आला असून, या भडकलेल्या हिंसाचाराला सुरक्षा दलाने आटोक्यात ठेवले. परंतु परिसरात अजूनही दहशत

पत्रकार बाळ बोठेला हायकोर्टाचा दणका ; जामीन अर्ज फेटाळला | DAINIK LOKMNTHAN
 आमदार माधव पाटील यांनी आज घेतले खंडोबाचे दर्शन 
भाजी बाजारात भरधाव वेगात घुसला पाण्याचा टँकर, जमावाला तुडवतानाचा पाहा व्हिडिओ | LOK News 24

इम्फाळ ः मणिपूर राज्यातील हिंसाचार पुन्हा एकदा उफाळून आला असून, या भडकलेल्या हिंसाचाराला सुरक्षा दलाने आटोक्यात ठेवले. परंतु परिसरात अजूनही दहशत दिसते. जिरीबामच्या अनेक संवेदनशील भागांत कलम 144 लागू करण्यात आले आहे. सीआरपीएफच्या तीन अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. शेकडो लोक तात्पुरत्या छावण्यांत राहत आहेत. तीन दिवसांत कुकी तसेच मैतेई समुदायाची किमान 150 घरे पेटवून देण्यात आली. त्यामुळे सुमारे 2 हजार लोक विस्थापित झाले. मणिपूरमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यात सुरू झालेल्या हिंसाचारानंतरही जिरीबाम जिल्ह्यात शांतता होती. परंतु एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर सोशल मीडियात त्याला जातीय हिंसाचार असल्याचे संबोधण्यात आले.

COMMENTS