Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर संधी

पुणे ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबता सस्पेन्स संपला असून, गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा

मल्टीप्लेक्समध्ये फक्त 75 रुपयांत पाहता येणार ‘ब्रह्मास्त्र’
उल्हासनगर मधील पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला (Video)
अहमदनगरमध्ये केमिकल कंपनीत अग्नितांडव l

पुणे ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबता सस्पेन्स संपला असून, गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांनी आज मुंबईतील विधानभवनात राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी मान्यवर उपस्थित होते. बारामती लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागणार अशी चर्चा सुरू होती. त्याचबरोबर राज्यसभेच्या जागेसाठी सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांचेही नाव आघाडीवर होते. अखेर या सर्व चर्चांना पुर्णविराम मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली होती. ऐनवेळी उमेदवारी घोषित केली जात असेल तर याचा अर्थ उमेदवार आधीच निश्‍चित करण्यात आला आहे, मग उगाचच उमेदवारीसाठी वेळ का घालवण्यात आला? असा प्रश्‍नही छगन भुजबळांनी या बैठकीत अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांना विचारला आहे. लोकसभेच्या पराभूत उमेदवाराला बॅक डोअर एन्ट्री का दिली जात आहे असाही सवाल छगन भुजबळांकडून करण्यात आला आहे. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक गट नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षात केवळ सुनील तटकरे, अजित पवार आणि प्रफुल पटेल हेच निर्णय घेत असून इतरांशी निर्णय प्रक्रियेबाबत सल्लामसलत होत नसल्याने एका गटात नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे.

प्रत्येकवेळी मनासारखे होत नाही ः भुजबळ – दरम्यान, सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी उत्सुक असलेले मंत्री छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबतची नाराजीही त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवली आहे. राज्यसभेसाठी मी इच्छुक होतो. मात्र प्रत्येकवेळी मनासारखे होत नाही, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे.

COMMENTS