अकोले ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व अॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालय राजूर, तालुका अकोले यांचे संयुक्त विद्यमाने स्कूल कनेक्ट (एन. इ.
अकोले ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व अॅड. एम. एन. देशमुख महाविद्यालय राजूर, तालुका अकोले यांचे संयुक्त विद्यमाने स्कूल कनेक्ट (एन. इ. पी. कनेक्ट) या अभियान अंतर्गत इ.12 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 10 जून रोजी कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत 100 पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी होते
या कार्यशाळेत प्रमूख व्याख्याते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता, व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ पुणे, विभागाचे संचालक डॉ. व्ही.बी.गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे मत व्यक्त केले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देणारे, विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेत वाढ करणारे, व स्वयंभू करणारे आहे.विषय निवडीचे स्वातंत्र्य ,आंतर शाखीय विद्याशाखा निवड, प्रत्यक्ष कामाचा अनुभव, खंडित शिक्षण पुन्हा घेण्याची सुविधा, मातृभाषेत शिक्षण, व संशोधन प्रेरणा, संस्काराची जोड, रोजगार निर्मिती ही या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. म्हणून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थ्यांच्या हिताचे असून त्याबाबतची माहिती विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी समजून घेणे आवश्यक आहे . अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे त्यांनी या वेळी दिली. महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख उपस्थित होते, प्रास्ताविक डॉ. बी. टी. शेणकर यांनी केले, प्रमुख अतिथींचा परिचय डॉ. व्ही.एन.गीते यांनी करुन दिला.आभार प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
COMMENTS