Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पन्नास टक्के अनुदानावर मिळणार नारळ व आंब्याची रोपे ः सोमनाथ डफाळ

कोपरगाव शहर ः वाढत्या तापमानाचा विचार करता पर्यावरण संतुलित राहण्यासाठी झाडे फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात तसेच शेतकर्‍यांना देखील थोड्याफार

कळसुबाई शिखर आणि भंडारदरा धरण परीसरात नवीन वर्षासाठी प्रशासन सज्ज
Ahmednagar : नाशिक-पुणे महामार्गावर सीएनजी गॅस वाहतूक करणारा टेम्पोचा अपघात | LOKNews24
अहमदनगर महापालिकेत भाजप-सेना नगरसेवक भिडले

कोपरगाव शहर ः वाढत्या तापमानाचा विचार करता पर्यावरण संतुलित राहण्यासाठी झाडे फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात तसेच शेतकर्‍यांना देखील थोड्याफार प्रमाणात शेतीजोडधंद्यातुन आर्थिक लाभ व्हावा याच बाबीचा विचार करत कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेने शेतात लावण्यासाठी 50 टक्के अनुदानावर उच्च प्रतीची  नारळ व आंब्याची रोपे उपलब्ध करून दिली असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ डफाळ यांनी दिली आहे.
सविस्तर वृत्त असे की, नेहमीच सामाजिक कार्यात तसेच पर्यावरण संवर्धन क्षेत्रात अग्रेसर असलेली कोपरगाव तालुक्यातील ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्था कार्यरत करत असते. याहीवर्षी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ डफाळ यांनी शेतकर्‍यांना शेती सोबत जोडधंदा म्हणून शेताच्या बांधावर लावलेल्या झाडापासून आर्थिक लाभ व्हावा या उद्देशाने शेतकर्‍यांना शेताच्या बांधावर लावण्यासाठी उच्च प्रतीचे नारळ व आंब्याची रोपे 50 टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिली आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी संस्थेकडे असलेली 50% अनुदानावरील नारळ व आंब्याची रोपे घेऊन आपल्या शेतात व बांधावर लावावी. यातून आपल्या उत्पन्नाचा आर्थिक सोर्स तर वाढणारच आहे परंतु त्यासोबतच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी देखील आपल्या माध्यमातून छोटासा हातभार लागणार आहे.50 टक्के अनुदानावर आंबा व नारळाची रोपे मिळविण्यासाठी  ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्था ब्राह्मणगाव तालुका कोपरगाव यांच्या 8788193839 या क्रमांकावर संपर्क साधावा.

COMMENTS