Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हॉस्पिटलचे साहित्य नेण्यास मज्जाव करणाऱ्या महिलांना धक्काबुक्की विनयभंग

गुन्हा दाखल

अहमदनगर : भाडेतत्त्वावर चालवण्यात दिलेले हॉस्पिटलचा करार मोडीत काढून हॉस्पिटलचे साहित्य घेऊन जाणाऱ्यांना मज्जाव केल्याने दोन महिलांना धक्काबुक्की

डॉ. भागवत आनंदा लहारेंचा मृतदेह आढळला
श्रीगोंद्याची श्रुतिका झगडे वेशभूषा स्पर्धेत जिल्ह्यात अव्वल
वडगाव गुप्ता ग्रामस्थांनी केले सीना नदीचे जलपूजन

अहमदनगर : भाडेतत्त्वावर चालवण्यात दिलेले हॉस्पिटलचा करार मोडीत काढून हॉस्पिटलचे साहित्य घेऊन जाणाऱ्यांना मज्जाव केल्याने दोन महिलांना धक्काबुक्की करून विनयभंग केल्याची घटना सावेडी परिसरात घडली.  याबाबतची माहिती अशी की साविडी परिसरातील नामांकित हॉटेल सन 2020 मध्ये तिघांनी भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतले होते परंतु त्यांच्यात झालेल्या करार रिसर्च सेंटर यांच्यासोबत सक्षम नसल्याबाबत कळविल्याने त्यांनी हॉस्पिटल बंद केले त्यानंतर हॉस्पिटल बंद असताना त्यातील गणेश फसले याने हॉस्पिटलच्या ताब्यावरून वाद घातला. हा वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला. त्यानंतर दिनांक 9 रोजी यातील गणेश सर्जेराव फसले यांनी काही अनोळखी व्यक्तींबरोबर येऊन हॉस्पिटलमध्ये ठेवलेले साहित्य टेम्पोमध्ये टाकून नेण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांना तेथील दोन महिलांनी मज्जाव केला असता त्या दोघींनाही गणेश फसले याने धक्काबुक्की करून खाली पाडले व त्यांना वाईट शिवीगाळ केली तसेच तरुणीला ज्या उत्पन्न होईल असे वर्तन करून त्याचा विनयभंग केला व धमकी दिली.  याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली पुढील कारवाई तोफखाना पोलीस करीत आहे.

COMMENTS