Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी कॉलेजमधील 6 विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग आणि प्लेसमेंट स

कुटुंबियांना मारण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार
मेहेरबाबांच्या आगमन शताब्दीनिमित्त काढली शोभायात्रा
Sangamner : संगमनेर शहरामध्ये ६० टक्के लसीकरण पूर्ण (Video)

श्रीगोंदा शहर प्रतिनिधी : श्रीगोंदा येथील छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग आणि प्लेसमेंट सेल मार्फत आयोजित केलेल्या कॅम्पस मुलाखतीमधून भारतातील नामांकित अरेजन लाईफ सायन्स, हैद्राबाद आणि डोंबिवली येथील क्यालिक्स फार्मा लि. या औषध कंपनीत रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागात  चांगल्या पॅकेजवर एम.एस्सी भाग -2 या वर्गातील 6 विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली.
कॅम्पस आयोजन करता अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका सौ. अनुराधाताई नागवडे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच प्लेसमेंट सेलचे चेअरमन प्रा.विलास सुद्रिक यांनी याकरता विशेष मेहनत घेतली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये किरण खटके, रविकांत पुराणे, गोरख मिंधे, ऋषिकेश महारनुर, सुवर्णा आमले,सीमा गलांडे यांचा समावेश आहे. प्लेसमेंट सेल मार्फत रोजगार मेळावा आणि कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन करण्यात येते. मागील वर्षी सरकारी तसेच खाजगी क्षेत्रात 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्याची माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतीशचंद्र सुर्यवंशी यांनी दिली. या निवडीबद्दल छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, संस्थेचे सर्व विश्‍वस्त, जिल्हा बँक संचालिका अनुराधाताई नागवडे, संस्थेचे निरीक्षक सचिनराव लगड, प्राचार्य डॉ. सतीशचंद्र सुर्यवंशी, विभागप्रमुख डॉ.सुर्यवंशी एम.डी., सर्व कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी अभिनंदन केले.

COMMENTS