कोपरगाव तालुका ःकोपरगाव तालुक्यातील 80 गावातील भौगोलिक क्षेत्र 70 हजार 613 हेक्टर आहे.त्यामध्ये लागवडीस योग्य असलेले 60 हजार 794 हेक्टर आहे. 38
कोपरगाव तालुका ःकोपरगाव तालुक्यातील 80 गावातील भौगोलिक क्षेत्र 70 हजार 613 हेक्टर आहे.त्यामध्ये लागवडीस योग्य असलेले 60 हजार 794 हेक्टर आहे. 38 हजार 377 हेक्टर बागायती तर 22 हजार 497 हेक्टर जिरायती आहे. सरासरी 47 हजार 480 हेक्टर क्षेत्र खरीप हंगामासाठी आहे त्यातील 44 हजार दोनशे हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे.त्यात सर्वाधिक 25 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन तर 15 हजार हेक्टरवर मका पेरणीचे नियोजन आहे.
तालुक्यातील 80 गावाम्ध्ये कृषी विभामार्फत यंदाच्या खरीप हंगामात 44 हजार 200 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे, त्यासाठी बियाणे, खत, औषधे, कीटकनाशकांची मागणी करण्यात आली आहे. तसेच तालुक्याचे सरासरी 404.20 मि.मी. इतके पर्जन्यमान असून मागील वर्षी 604.10 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. वेळेत पाऊस सुरू झाल्याने चांगला पाऊस पडण्याची अपेक्षा शेतकर्यांना आहे. बियाणे आणि खतांचा अडचण येऊ नये व काळाबाजार होऊ नये, यासाठी कृषी विभागाचे पथके नियुक्त केली आहेत तसेच कृषी सेवा केंद्रांची तपासणीही केली जात आहे. यावर्षी बाजरी-1200, मका 15 हजार, कापूस-2200, सोयाबीन-25 हजार, तुर-100, मुग 350, उडीद 50, भुईमुग 300 अशा 44 हजार 200 हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. तालुकयात आवश्यक बियाणे बदल प्रमाणानुसार लागणारे बियाणे बाजरी 48 क्विंटल, मका 2250 क्विटंल, तुर 5 क्विंटल, मुग 21 क्विंटल, उडीद 4 क्विंटल, भुईमुग 75 क्विंटल, सोयाबिन 6563 क्विंटल तर कापुस 8800 पाकिटे बियाण्यांची आवश्यकता लागणार आहे.
खरीप पेरणी करण्याअगोदर शेतक-यांनी बियाणी उगवण क्षमता तपासून घ्यावी. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट टळेल.कृषी विभागामार्फत 2024-25 या खरीप हंगामाची पूर्ण तयारी झाली आहे. बियाणे, खते, औषेधे यांची मागणी करण्यात आली असून ते उपलब्ध होत आहे.
मनोज सोनवणे, तालुका कृषी अधिकारी कोपरगाव
COMMENTS