Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमृतवाहिनी कॉलेजचा बारावीचा 99.39 टक्के निकाल

आयटीआय बारावी समकक्ष विद्यार्थ्यांचा शंभर टक्के निकाल

संगमनेर ः आपल्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यरत असणार्‍या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील अ

सुकेवाडी शिवारात आढळला तरुणाचा मृतदेह
बेलापूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वाती अमोलिक
Akole : राजूर येथे आगळे वेगळे गणेश विसर्जन

संगमनेर ः आपल्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यरत असणार्‍या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेतील अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेज चा इयत्ता बारावीचा निकाल 99.39 टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य श्रीमती शीतल गायकवाड यांनी दिली आहे.
विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे व विश्‍वस्त शरयू ताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी मॉडेल स्कूल ने आपली गुणवत्तेची परंपरा कायम राखली असून इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी संस्थेतून 165 विद्यार्थी बसले होते यापैकी 164 विद्यार्थी पास झाले असून एकूण निकाल 99.39% लागला आहे. 75 % च्या पुढे 16 विद्यार्थ्यांना मार्क मिळाले आहेत .यामध्ये नवले कशिश सुनील यांने 71.50 % गुण मिळून प्रथम क्रमांक मिळवला. तर सुरज श्रीकांत भागवत यांनी 66.33%  गुण मिळून द्वितीय क्रमांक मिळवला .कुणाल संतोष कांबळे यांनी 66.17% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला. याचबरोबर आयटीआय मध्ये कौशल्य आधारित प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी याकरता आयटीआय पास झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता बारावीची मराठी, इंग्रजी विषय देऊन प्रात्यक्षिक परीक्षा व टर्मवर्क पूर्ण करून ही परीक्षा देता येते .यामध्ये अमृतवाहिनी आयटीआयच्या 11 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामधून बाहेर अभिषेक ज्ञानेश्‍वर याने प्रथम क्रमांक मिळवला असल्याची माहिती प्राचार्य विलास भाटे यांनी दिली. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ सुधीर तांबे, विश्‍वस्त शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. जे बी गुरव, प्रा. व्ही.बी धुमाळ, प्राचार्य श्रीमती शितल गायकवाड, प्राचार्य विलास भाटे, विभाग प्रमुख प्रा. उदय करपे आदींसह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS