Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तिडके पाटील विद्यालयाचा दहावीचा 98.88 टक्के निकाल

कोपरगाव शहर ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच मंडळाच्या

कुसडगाव ’एसआरपीएफ’ केंद्र व कर्जत डेपोचे उद्या लोकार्पण
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी बलशाली भारताचे स्वप्न साकार करावे ः प्रा. बाबा खरात
कुस्तीला वैभव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील : केंद्रीय मंत्री मोहोळ यांची ग्वाही

कोपरगाव शहर ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा अंतिम निकाल नुकताच मंडळाच्या संकेतस्थळा वर प्रसिध्द झाला असून यात कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील रयत शिक्षण संस्थेचे मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत  विद्यालयाचा शेकडा निकाल 98.88%. इतका लागला आहे. नुकताच जाहीर झालेल्या निकालात विद्यालयातील 90 विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते त्यापैकी 90% टक्के गुणांचा पुढे 3 विद्यार्थी, विशेष प्राविण्य मिळविणारे  46 विद्यार्थी, प्रथम श्रेणी मिळविणारे 36 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण होणारे  4 विद्यार्थी असे एकूण 89 विद्यार्थी यशस्वी झाले आहे तर यात
  चांदगुडे वैष्णवी पवनकुमार हिने 92.60 टक्के टक्के मार्क मिळवत प्रथम क्रमांक, भाकरे अनुष्का दत्तात्रेय हिने 90.40 टक्के टक्के मार्क मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला आहे तर  चांदगुडे ईश्‍वरी अरविंद हिने 90.20% टक्के मार्क मिळवत तृतीय क्रमांक मिळविला आहे. या सर्व  यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांचा पालकांचे व मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेचे  उत्तर विभागीय अध्यक्ष आमदार आशुतोष काळे, इन्स्पेक्टर बोडखे साहेब, सहाय्यक इन्स्पेक्टर तोरणे  साहेब,  नाईकवाडी साहेब, नवी मुंबई येथील उद्योजक प्रकाश तिडके पाटील, स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेबराव पाटील तिडके, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य सचिन चांदगुडे, सिताराम गाडे, भास्कर चांदगुडे. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माजी मुख्याध्यापक जामदार सर, मनेषभाऊ गाडे, चासनळीचे सरपंच सुनीताताई बनसोडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक मांडवडे ए.आर. विद्यालयाचे पर्यवेक्षक  ठुबे जे. एस. आदी सह विद्यालायातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक. माता पालक संघ, पालक संघ, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, माजी विद्यार्थी यांच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहे.

COMMENTS